शिवशौर्यगाथा सांस्कृतिक कार्यक्रमात पोदार स्कूल ने पटकविला द्वितीय क्रमांक

पुसद: येथील छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ मध्ये शिवशौर्यगाथा छत्रपतींच्या जीवन चरित्रावर आधारित आंतरशालेय संस्कृतिक स्पर्धेत विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकविला.या कार्यक्रमात शहरातील ११ शाळा सहभागी झाल्या होत्या. पोदार स्कूल मधील ३० विद्यार्थ्यांनी मिळून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र, मुघलांचे अत्याचार, महाराजांचा जन्म ते अफजलखानाचा वध या संपूर्ण घटनांचे सादरीकरण अतिशय प्रभावी व नीटनेटकेपणाने करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शालेय उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर असणाऱ्या व अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केलेल्या पोदार स्कूलने आंतरशालेय स्पर्धेमध्ये सुद्धा आपली छाप सोडत संपूर्ण शहरातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.श्री शिवाजी महाराज व अफझल खान यांची भूमिका करणाऱ्या विद्यार्थ्यांची देहबोली व अभिनय हा कसलेल्या अभिनेत्यासारखा होता.छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कृष्णा पवार,राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत कृतिका रुडे, अफजलखानाच्या भूमिकेत साई बंग या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच मावळे व इतर भूमिका आर्या गावंडे, अथश्री भांद्क्कर, रितिका खंदारे, सदया मोरे, अमृता मोरे, आर्या जाधव, आरोही घटमल, मनस्वी बासटवार, मीरा पटेल, हर्षिता आडे, जान्हवी पाटील, पारस आहाळे, मयूर राठोड, अथर्व भांगे, रुद्र चव्हाण, समर्थ भोने, अनय ठाकरे, जय राठोड, कृष्णा चव्हाण, सार्थक मार्कड, सत्यम जाधव, सार्थक पवार, सोहम पांडे, सुशांत आढाव, कृष्णा चव्हाण, रुद्र आडे, शिवांश दूधेवार इत्यादी विद्यार्थ्यांनी साकारल्या.छत्रपती श्री शिवाजी महाराज व अफजल खानाची भूमिका निभावणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणा बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शरद मैंद, सचिव श्री सुरज डुबेवार, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल, कोषाध्यक्ष मनिष अनंतवार, सहसचिव श्री संगमनाथ सोमावार, शाळेच्या प्रिन्सिपल सौ अनुपमा भट देशमुख व सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सादरीकरणाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील तृप्ती हस्तक, धनश्री राठोड, राजरतन कांबळे, वर्षा पाटील या शिक्षक बंधू भगिनींनी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.



