Uncategorized

यवतमाळ- वाशिम लोकसभा निवडणुकीत १७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद; सरासरी ६१.३१ टक्के मतदानाचा अंदाज! कोण बाजी मारणार.?

पुसद: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्या प्रमाणेच दुसऱ्या टप्प्यात उष्णतेची लाट असूनही देशभर मतदान चांगल्या प्रमाणात आणि शांततेत पार पडले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील १८ व्या लोकसभेसाठी यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात वाजेपर्यंत ६१.३१ टक्के मतदान पार पडले. परंतु महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात काहीसे कमी मतदान झाले. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीची दि. २६ रोजी मतदान प्रकिया पार पडली यामध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून शिवसेनेच्या सौ.राजश्री हेमंत पाटील ह्या उभ्या आहेत. तर महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय देशमुख, बसपाचे हरीभाऊ राठोड, समनक जनता पक्षाचे अनील राठोड, हिंदू राष्ट्रसंघाचे अमोल कोमावार, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे (लोकशाही), ओंकार इंगोले, सन्मान राजकीय पक्षाचे धरम दिलीपसिंह ठाकूर, तर अपक्ष म्हणून डॉ. अर्जुनकुमार राठोड, प्रा. किसन अंबुरे, गोकूळ चव्हाण, दीक्षांत सवाईकर, नूर अली महेबूब अलीशहा, मनोज गेडाम, रामदास घोडाम, विनोद नंदागवळी, संगीता चव्हाण व संदीप शिंदे असे एकूण १७ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर एक नोटाचे चिन्ह मतदानयंत्रावर आहे.पुसद विधानसभा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यात ५३ टक्के तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद असतांनाही मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. मात्र तरीही मागील वर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरल्याचा अंदाज आहे. किरकोळ प्रकार वगळता पुसद विधानसभा मतदार संघातील २३७ केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. निवडणुकीत १७ उमेदवार असले तरीही महाविकास आघाडीचे संजय देशमुख व महायुतीच्या उमदेवार सौ. राजश्री पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडुन दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. पुसद विधानसभा मतदार संघात ३ लाख ८ हजार ६९२ मतदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख व त्यांच्या पत्नी सौ. वैशाली, मुलगा पृथ्वीराज व मुलगी साक्षी यांनी जि. प. उच्च प्राथ. आदर्श शाळा, चिंचोली क्र. २ ता. दिग्रस येथे आपल्या कुटुंबियासह मतदानाचा हक्क बजावला. लोकनेते मनोहरराव नाईक यांनी आपल्या मताचा हक्क बजावला. त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी माजी नगराध्यक्षा सौ. अनिता नाईक, पुसद विधानसभा मतदार संघाचे आमदार इंद्रनिल नाईक व सौ. मोहिनी इंद्रनिल नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला. महायुतीच्या उमेदवार सौ. राजश्री पाटील यांचे नांदेड येथे मतदार यादीत नाव असल्यामुळे त्यांना स्वतःसाठी मतदान करता आले नाही.

आ.ॲड. निलय नाईक यांनी पत्नी डॉ. सौ सुजाता नाईक यांचे सह आपल्या मूळ गावी गहुली येथे मतदानाचा हक्क बजावला. माजी जि. प. उपाध्यक्ष ययाती नाईक व त्यांच्या सौ. सोनल ययाती नाईक यांनी शेलु बु. येथे मतदानाचा हक्क बजावला.

विधान परिषद सदस्यआ. डॉ. वजाहत मिर्झा यांनी पुसद येथील कै. शेषराव पाटील न. प. मराठी शाळा क्र. ३ येथे आपल्या मताचा हक्क बजावला.

बा. ना. कापूस उत्पादक सह. सूतगिरणी पिंपळगांवचे माजी अध्यक्ष डॉ. एम.डी. राठोड यांनी पुसद येथील हिंदी न. प. हायस्कूल केंद्रावर मताचा हक्क बजावला तर राष्ट्रवादी कॉग्रेस(शरद पवार) लिगल सेलचे प्रदेश अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख यांनी जांबबाजार येथे आपल्या मताचा हक्क बजावला. शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख ॲड. उमाकांत पापीनवार व त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया पापीनवार यांनी न. प. शाळा क्र.२ पुसद येथे आपल्या मताचा हक्क बजावला.

जि.प. यवतमाळचे माजी शिक्षण सभापती बी. जी.राठोड यांनी आडगांव येथे आपल्या मताचा हक्क बजावला. जयनगर पुसद येथील रहिवासी चि. प्रा.नयन बोंढारे यांनी आपल्या लग्नाच्या आधी सकाळी सात वाजता मतदान केले नंतर आर्णीकडे सहपरिवार व इष्टमित्र सह मतदान करूनच रवाना झाले.पुसद येथील चि. सौ .का. रेणुका प्रदीप गोरे यांचा विवाह चि‌ प्रतीक विजयकुमार रवने अकोला तालुका मलकापूर यांच्याशी एक वाजून दहा मिनिटांनी होता त्यामुळे त्यांनी सकाळी बूथ क्र १६३मतदान करून विवाह केला

मनाली देशमुख रा. जयनगर पुसद हिने लग्नापुर्वी मतदानाचा हक्क बजावला. पुसद येथील न. प. मराठी उच्च प्राथ. शाळा क्र. ६ येथे आकीब रिजवी, फिरोज खान, सैय्यद जानी, नेहाल बेग यांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील कुलसुनबी अब्दुल रहीम यांनी मतदानाचा हक्क बजावला. पुसद येथील दै. सकाळचे बातमीदार कैलास जगताप व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जगताप मताचा अधिकार बजावला. पोहरादेवी येथील संत महंत सुनिल महाराज हे पोहरादेवी येथील उर्दु प्राथमिक शाळेत आपल्या मतदानाचा हक्क बजावतांना. पुसद येथील प्रतिष्ठित व्यापारी संतोषकुमार चंदनमल अग्रवाल वय ७८ यांना ऑक्सीजनची आवश्यकता असतांना सुध्दा त्यांनी पहिले मतदानाचा हक्क बजावला. गोपवाडी या गावातील नागरी सुविधा न मिळाल्यामुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. हा सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा दिसुन येतो. हुडी येथे ईव्हीएम मशिन बंद पडल्यामुळे काही वेळ मतदान प्रकिया थांबविण्यात आली होती तर रोहडा येथे काही गटाकडुन पैशे वाटत असल्याचे समजताच नोडल ऑफीसर स्नेहल देशमुख यांनी तात्काळ कारवाई केली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविला. पुसद शहरातील वसंतनगर व गढी वार्ड येथील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पुरुष व महिलांनी गर्दी केली होती. श्रीरामपूर येथे तीन केंद्रावर २९९२ पैकी १६१७ मतदारांनी मताचा हक्क बजावला. टक्केवारी ५४.०४ टक्के आहे. आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी हजेरी लावली होती. ठिकठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पाडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ. राजश्री पाटील महाले व शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक अतितटिची राहिली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मात्र ४ जून रोजी मतमोजणी दिवशी समजदार आहे. तोपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार आहे.

२०१९ मधील मतदानाची स्थिती.                  वाशिम विधानसभा मतदारसंघात दोन आठ हजार ५८३ अर्थात ६०.४० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कारंजा विधानसभा क्षेत्रात एक लाख ७१ हजार ५८४ (५७.४५ टक्के), राळेगाव विधानसभा क्षेत्रात एक लाख ९६ हजार ७५८ (६९.९१ टक्के), यवतमाळ विधानसभा क्षेत्रात दोन लाख पाच हजार ३८६ (५४.१२ टक्के), दिग्रस विधानसभा क्षेत्रात दोन लाख सात हजार २४८ (६४.६९ टक्के) तर पुसद विधानसभा क्षेत्रात एक लाख ८० हजार २४७ मतदारांनी मतदान केले होते. हा टक्का ६२. २७ टक्के एवढा होता. लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये १९ लाख १४ हजार ७८५ मतदार होते. यापैकी ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी मतदान करून मतदान हक्क बजावला होता. ही टक्केवारी६१.०९ एवढी होती. २०१४ च्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ झाली होती. राळेगाव विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक तर यवतमाळ क्षेत्रात सर्वात कमी मतदान झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close