पुसद: येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९७वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे तर प्रमुख पाहुणे गजानन हिंगमिरे उपस्थित होते सर्व प्रथम प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सर्व कार्यकर्ते मंडळींनी सुद्धा पुष्प अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक विष्णू सरकटे यांनी केले प्रास्ताविकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट सांगितला नंतर किशोर कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नितीविना गती गेली गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले इतके सारे अनर्थ इतके सारे अनर्थ एका विद्येने केले अशा प्रकारचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेतून आपल्या अध्यक्ष भाषणातून प्रकाश टाकला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भीम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे अण्णा दोडके राजकुमार पठाडे जनार्दन झोडगे मधुकर सोनवणे सुभाष कोल्हे दीपक गायकवाड गजानन कांबळे राहुल दुर्गुळे दत्तराव कांबळे या असंख्य कार्यकर्त्याच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर खंदारे यांनी केले तर आभार अण्णा दोडके यांनी मानले