यवतमाळ गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५९७२६/-हाजाराचा प्रतिबंधित सुगंधीत पानमसाला गुटखा जप्त!

महागाव:यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसलेली असताना, प्रतिबंधित सुगंधीत पानमसाला गुटखा वर धडक कारवाईसुरू केली आहे. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत सुमारे ५९७२६/-रुपयाचा प्रतिबंधित सुगंधित पानमसाला गुटख्याचा मुद्देमाल जब्त करीत आरोपीला अटक करण्यात आली आहे. यामुळे गुटका तस्करांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दि.२९ जुलै २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महागाव पोलीस ठाण्यात हद्दीत आरोपी विठ्ठल दत्तराव बेलखेडे वय २४ वर्ष रा.प्रभाग क्रमांक ९ महागाव ता. महागाव जि. यवतमाळ, यांनी त्याच्या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु गुटखा विक्री करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठाच्या आदेशानुसार नमूद ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापा टाकला असता विविध कंपनीच्या प्रतिबंधित सुगंधित पान मसाला गुटखा किंमत ५९७२६/-मिळून आला आहे. त्यावरून आरोपीला ताब्यात घेऊन महागाव पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सा.सह कलम अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ नियम वाचन कलम ३०(२)(ए)चे उल्लंघन करून कलम ५९ अन्वये आरोपी विरुद्ध कलम १२३,२७४,२५७,२२३ विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई मा.डॉ.पवन बनसोड, पोलीस अधीक्षक, यवतमाळ,मा. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ,मा. ज्ञानोबा देवकाते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही पथक एपीआय गजानन गजभारे, हेड कॉन्स्टेबल सुभाष जाधव, हेड कॉन्स्टेबल तेजाब रणखांब, हेड कॉन्स्टेबल रमेश राठोड, हेड कॉन्स्टेबल कुणाल मुंडोकर, PC मोहम्मद ताज, DPSI रवींद्र श्रीरामे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या वतीने कारवाई करण्यात आली असून पुढील अधिक तपास सुरु आहे.



