निष्ठावंत शिवसैनिकाच्या निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट!

पुसद:राज्याचे माजी मुख्यमंत्री, तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे दि.१२मार्च रोज मंगळवारी हे पुसद येथील जनसंवाद सभेला संबोधित करण्यासाठी आले होते.
त्यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून असलेले राजू (आण्णा ) वाकडे यांच्या पुसद येथील निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली. निष्ठावान, विश्वासू शिवसैनिकांच्या घरी भेट देवून उद्धव बाळासाहेब ठाकरेनीं यांनी शिवसैनिकांसोबत स्नेहबंध कायम असल्याचे यानिमित्ताने दाखवून दिले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी पुसद शहराच्या दौ-यावर होते. त्यांनी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते राजू वाकडे यांच्या पुसद येथील घरी सदिच्छा भेट दिली. वाकडे परिवारासोबत सुध्दा संवाद साधला. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, माजी मंत्री संजय देशमुख, उद्धव कदम, कॅप्टन प्रशांत सुर्वे, विजय बाबर, माजी नगर सेवक हरीश गुरुवानी, माजी नगरसेवक अवि बहाद्दूरे, दिनेश गवळी, विजय वानखेडे, संजय शिंगणे व शिवसैनिक उपस्थित होते.
वाकडे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा उद्धव ठाकरे यांना भेट स्वरूपात दिली. राजू वाकडे हे १९८७ पासून शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निष्ठा राखून आहेत. पुसद तालुक्यातील सर्वात जुने आणि विश्वासू म्हणून वाकडे यांची ओळख आहे. वाकडे यांच्या वहिनी वर्षा दिलीप वाकडे यांनी पुसद न.प.च्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून मान मिळविला आहे. या भेटीतून राजू वाकडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. शिवसेनेने यापूर्वी सुध्दा विविध जबाबदाऱ्या राजू (आण्णा) वाकडे यांच्याकडे दिल्या होत्या.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुसद मतदारसंघातील एका निष्ठावंत शिवसैनिकांच्या घरी भेट दिल्याने. या भेटीनंतर शिवसैनिकांमध्ये व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.



