ईतर

माजी जि.प.सदस्य ॲड.अमय नाईक यांनी सिंगरवाडी येथील आगग्रस्त कुटुंबाची घेतली सांत्वनपर भेट!

लोकनेता कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण

पुसद : तालुक्यातील सिंगरवाडी येथे दि. ८ मार्च २०२४रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास चार घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत एका ७५ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला होता या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात होती.

त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दि.९ मार्च रोजी माजी जि.प. सदस्य ॲड.अमय नाईक यांच्या कार्यकर्त्यासह सिंगरवाडी येथे जाऊन आपली सामाजिक बांधिलकी जपत आगग्रस्त कुटुंबाला भेट देऊन पाहणी व चौकशी केली.

त्यांचे सांत्वन करुन धीर दिला पीडित कुटुंबाला सर्वतोपरी शासकीय मदत मिळण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले, तर त्यावेळी विधान परिषद सदस्य आमदार ॲड निलय भाऊ नाईक यांना तात्काळ संबंधित घटनेची संपूर्ण माहिती दिली तेंव्हा आमदार ॲड. निलयभाऊ नाईक संबंधित पीडित कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत मिळून देण्याचे आश्वासन दिले.या वेळी सुधाकर चव्हाण,विकास राठोड, गौरव दीक्षित, आशिष चव्हाण तसेच गावातील सुंदर्सिंग राठोड, भीमराव राठोड , शेषराव पवार उपसरपंच , नामदेव कारभारी, दिलीप राठोड, विजय राठोड, सुनील राठोड , एकनाथ जाधव, भिका पवार, सुधाकर राठोड,संजय चव्हाण, राहुल राठोड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close