आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हुडी बु. ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंचासह ग्रामसेविकेस अखेर अटक!

पुसद : तालुक्यातील हुडी बु. ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामसेविका यांनी संगणमत करून विविध विकासकामांसाठी शासनाकडून मिळालेल्या निधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले होते त्याप्रकरणी अखेर सरपंचासह ग्रामसेविकेस अखेर अटक करण्यात आली असून त्यांना वाशिम येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की पुसद तालुक्यातील हुडी बु.ग्रामपंचायतीच्या तत्कालीन महिला सरपंच व ग्रामसेविकांनी संगणमत करून तब्बल १४ लाख९१ हजार २३८ रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे. दोघींनीही भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी सरपंचांनी संबंधित कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. कारवाई होत नसल्याने उपोषण देखील केले होते.जवळपास दोन वर्षाच्या चौकशीनंतर ग्रामीण पोलिसांनी सरपंच व ग्रामसेविकेला अखेर अटक केले आहे.दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या महिला सरपंच व ग्रामसेविकेची वाशिमच्या कारागृहात रवानगी देखील केली आहे.सरपंच अनुराधा शिवानंद कान्हेकर व ग्रामसेविका अनिता दिगंबर आगाशे अशी ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये आर्थिक व्यवहार करून भ्रष्टाचार करणाऱ्या करणाऱ्यांची नावे असून त्यांच्या विरोधामध्ये माजी सरपंच संतोष धरणे यांनी गटविकास अधिकारी यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या.माजी सरपंच संतोष दरने यांनी दि.२८ मार्च २०२२ पासून आठ दिवस ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुद्धा केले होते.सरपंच व ग्रामसेविकेने हुडी बु. ग्रामपंचायतमध्ये सन २०१८-२०१९ मध्ये दलित वस्ती, तंटामुक्त मुक्त गाव,पाणीपुरवठा निधी,स्वच्छ भारत मिशन या योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे.तत्कालीन ग्रामसेविका व सरपंचसह सदस्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच संतोष धरणे यांनी तक्रारीत केली होती. सरपंच व ग्रामसेविकेने १४ लाख ९१ हजार २३८ रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे चौकशी अंती सिद्ध झाल्याने दोघींनाही ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू व बीट जमादार इंदल आडे यांनी अटक केले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंचासह ग्रामसेविकेला अटक केल्याने भ्रष्टाचार करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
ग्रामीण पोलिसांना वारंवार सहकार्य केले
ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच व ग्रामसेविकेने भ्रष्टाचार केल्याचे तक्रार मिळाली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी मागितलेल्या सर्व कागदपत्राची पूर्तता केली आहे. ग्रामीण पोलिसांना कागदपत्रासाठी वारंवार सहकार्य केले आहे.चौकशीत त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना अटक केले आहे.गरज भासल्यास पोलिसांना यापुढेही सहकार्य करणार आहे.–संजय राठोड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती,पुसद



