ईतर

चारशे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवशौर्य गाथेने घडविला शिवकालीन प्रवास

पुसदच्या शिव पर्व २०२४ दुसऱ्या पुष्पला उदंड प्रतिसाद

पुसद : येथील शिवजन्मोत्सव समिती द्वारा आयोजित शिव पर्व २०२४मध्ये काल दुसरे पुष्प गुंफवtana भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थे द्वारा प्रायोजित शिवराय यांच्या जीवनचारित्रावर आधारित शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवशौर्यगाथा या सांस्कृतिक स्पर्धेचे जोशपूर्ण आयोजन शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग प्रांगणात जिजाऊ परिसरात y करण्याmत आले होते. यामध्ये १४ शाळांच्या सुमारे 400विद्यार्थ्यांनी अभिनय कौशल्य सादर केले.शिव छत्रपतींचा जन्म, युद्ध प्रशिक्षण, स्वराज्य संकल्प शपथ, हिरकणी प्रसंग, आगऱ्याहुन सुटका,तानाजी मालुसरे यांची कोंढाण्याची लढाई, बाजीप्रभु देशपांडे, शिवा न्हावी यांचे बलिदान,अफझल खान वध, शिवराज्याभिषेक आदी महत्वपूर्ण प्रसंगांचे विद्यार्थ्यांनी रोमहर्षक सादरीकरण व सर्वांगसुंदर अभिनय करून उपस्थित शिवप्रेमींना शिवकाळाचा प्रवास घडविला.सर्व सादरीकरणा अखेर मातोश्री पार्वतीबाई नाईक इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 11हजार रु चे प्रथम क्रमांकाचे शिवाजी शिक्षण संस्थेचे गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलने 7हजार रु चे द्वितीय आणि गुणवंतराव देशमुख विद्यालय कवडीपुर पुसद यांनी तृतीय क्रमांकाचे हजार रु चे पटकावले.सर्व विजेत्यांना, सन्मान..चिन्ह तर सर्व सहभागी शाळांना प्रमापत्र देऊन गौरविण्यात आले. तब्बल चार तास चाललेल्या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन चंद्रकांत ठेंगे यांनी केले . यावेळी चिमुकल्यांच्या अदाकारीने जगदगुरु संत तुकोबाराय विचारपीठावर जणुकाही शिवशाही अवतरली होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून माजी नगराध्यक्ष सौ माधवी दिनकर गुल्हाने, सहा.शिक्षिका सौ.अर्चना सुनील गवळी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक यशवंत देशमुख, बा. ना.अभियांत्रिकीचे प्रा. प्रदीप दुधाट पत्रकार ललित सेता यांनी काम पहिले.

या स्पर्धेत विद्यालंकार पोदार लर्न स्कूल, कोषटवार दौलतखान विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतपुर, माउंट लिटरा झी स्कूल, जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल, सावित्रीबाई फूले इंग्लीश मिडीयम स्कूल, नवजीवन ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा, महात्मा मुंगसाजी विद्यालय, गुरुकुल कॉन्व्हेन्ट श्रीरामपूर, मातोश्री विद्यालय श्रीरामपूर या शाळांनी देखील स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.विजेत्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, जन्मोत्सव समितीचे मुख्य मार्गदर्शक तथा पुसद अर्बन बँकेचे शरद मैंद, युवक मंडळचे सचिव विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते क्रांती पाटील कामारकर, पतसंस्थेचे उपाध्यक्ष एड.भारत जाधव, शिव जन्मोत्सव समिती चे संयोजक नितीन पवार शोभयात्रा समिती प्रमुख अजय क्षीरसागर कौस्तुभ धुमाळे व सर्व परीक्षक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close