ईतर

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पुसद येथे भेट;डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्य करण व संभाजी नगर येथील बौध्द विहाराच्या बांधकामासाठी निवेदनाद्वारे केली एक कोटीची मागणी!

पुसद : येथील शासकीय विश्रामगृहावर दि.१५ जानेवारी २०२४रोजी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग भारत सरकार रामदासजी आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पुसद तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाठोरे,व शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी रिपाईच्या सर्व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरण करण्यासाठी व संभाजीनगर मधील बौद्ध विहार व सांस्कृतिक भवनाच्या बांधकामासाठी या दोन्ही कामासाठी एक कोटीच्या रुपयाच्या निधीची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे शासकीय दौरा वाशिम,अकोला मार्गे पुसद येथे रात्री ९:३० वाजता शासकीय विश्रामगृह पुसद येथे आले होते.यावेळी रिपाईच्या पुसद येथील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आठवले साहेबांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला नंतर बैठकीमध्ये विविध विषयावर सर्व कार्यकर्त्यासोबत अर्धा तास चर्चा करण्यात आली.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व संभाजीनगर येथील बौद्ध विहाराच्या बांधकामासाठी त्वरित निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पुसद पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाठोरे,शहर अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, दिनेश खांडेकर, प्रा.अंबादास वानखेडे, प्रकाश धुळे,अमर पाटील,वसंता वाघमारे, दिनेश सावळे,नितेश खंदारे,भास्कर बन्सोड, विशाल पडघणे,राजेंद्र नाईक, समाधान केवटे,पांडुरंग पुलाते, भिमराव ग.कांबळे, जयराम मातने इत्यादी कार्यकर्ते स्वाक्षऱ्या करून हजर होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close