मनोज जरांगे पाटीलांच्या दौऱ्यावेळी पाकीट मारणाऱ्या सातजणांना अटक;५,३१,०६० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची मोठी कार्यवाही!

पुसद:मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत यामध्ये आता यवतमाळ जिल्ह्यात दौरा व सभा सुरू आहेत. सभांमधून पाकीट-मोबाईलची चोरी करणारे चोरटी टोळी सक्रिय असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह सात पाकीटमरांना अटक केली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की,मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा यवतमाळ जिल्हयातील पुसद, उमरखेड, महागांव परिसरात दि.५ डिसेंबर२०२३ ते ७ डिसेंबर२०२३ दरम्यान दौरा कार्यक्रम असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांना सुध्दा नमुद परिसरात गुन्हेगार शोध व बंदोबस्त करीता नेमण्यात आले होते.मनोज जरांगे पाटील यांचे यापुर्वी झालेल्या सभा व कार्यक्रमाचे ठिकाणी बऱ्याच प्रमाणात चोरी, पाकीटमारी, चैन चारीचे प्रकार झालेले होते त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्हयात सुध्दा नमुद कार्यक्रमाकरीता गर्दीचा फायदा घेवुन असे चोरटे सक्रीय राहणार असल्याचा संशय स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांना होता.दि.६ डिसेंबर२०२३ रोजी मनोज जरांगे पाटील यांचा स्वागत कार्यक्रम मौजे गुंज ता. महागांव येथे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक बंदोबस्त व गुन्हेगार शोधाचे दृष्टीने तेथे हजर असतांना सदरचे स्वागत कार्यक्रमाचे गर्दी दरम्याण काही लोकांचे खिशातील रक्कम चोरी गेली असल्याचे समजल्याने पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत व स्वतः केलेल्या निरीक्षणातुन दिग्रस येथील काही पाकीटमार व मोबाईल चोर हे गुंज येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी एक चार चाकी वाहन व एक ॲटो रिक्षातुन आले असल्याचे माहिती वरुन सदरचे संशयीत इसमांचा शोध घेत असतांना गुंज येथील भाऊचा चहा या चहाचे हॉटेल जवळ एक एम. एच .२९ ए डी- ५४९० क्रमांकाची स्विफ्ट डिझायर व त्याबाजुला एक विना क्रमांकाची अँटोरिक्षा दिसुन आल्याने जवळ जावुन पाहाणी केली असता चारचाकी वाहनाजवळ तिन इसम व ॲटोरिक्षा जवळ चार इसम उभे असलेले दिसले वरुन त्यांना खात्री करण्याकरीता ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव पत्ता बाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे १) सैय्यद अतिक सैय्यद सादीक वय २५ वर्षे, रा. मोतीनगर दिग्रस, २) शेख अतीक शेख गफ्फार वय २३ वर्षे रा. मोतीनगर दिग्रस, ३) अब्दुल रहेमान अब्दुल सत्तार वय ५५ वर्षे, रा. चांद नगर दिग्रस, ४) शाहरुख खान नासीर खान वय ३० वर्षे, रा. मोतीनगर दिग्रस, ५) शेख इसमाईल शेख चांद वय ४२ वर्षे, रा. मोतीनगर दिग्रस, ६) परवेज खान एहेसानउल्ला खान वय ३३ वर्षे, रा. चांद नगर, दिग्रस, ७) राजा मधुकर तांडेकर वय ३० वर्षे, रा. मोती नगर दिग्रस असे सांगीतल्याने त्यांना सदर ठिकाणी वाहनासह हजर येण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली वरुन पंचासमक्ष त्यांची व वाहनाची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जातुन त्यांचे वापरात असलेले वेगवेगळया कपंनीचे ०७ मोबाईल किर्मत ५३,०००/- रु व नगदी ८०६०/- रु मिळुन आल्याने त्यांना विश्वसात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी अशा कार्यक्रमाचे व गर्दीचे ठिकाणी एकत्रीत जावुन हातसफाईने पाकीटमारी व चोरी करीत असल्याचे व सर्व रक्कम एकत्र जमा करुन नंतर वाटप करीत असल्याचे सांगीतल्याने वरील प्रमाणे मिळुन आलेला मुद्देमाल व त्यांचेकडील ०२ वाहने असा एकुण ५,३१,०६०/ रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन सदर प्रकरणात पो.स्टे. महागांव येथे चोरीचा गुन्हा नोंद असल्याने पो.स्टे. महागांव यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पो.स्टे. महागांव यांचेकडून सुरु आहे. नमुद सर्व आरोपी हे रेकॉर्ड वरील चोरी पाकीटमारी करणारे गुन्हेगार असून ते गदीं असणारे कार्यक्रम शोधुन पाकीटमारी, चैनचोरी असे प्रकार करतात.सदरची कार्यवाही ही डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ,आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था. गु.शा. यवतमाळ यांचे मार्गदर्शनात, सपोनि गजानन गजभारे, सपोनि अमोल सांगळे, पोलीस अंमलदार, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, राजेश जाधव सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



