हिवरा संगम येथे सम्राट बळीराजा पूजन : शेतकरी पुत्र कनिष्ठ अभियंता महेश भोयर यांचा सत्कार!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):सात काळजाच्या आत राखून ठेवावा असा माणूस म्हणजे सम्राट बळीराजा.”ईडा पीडा टळू दे,बळी चे राज्य येऊ दे” अशा घोषणेत मंगळवार दि.१४ नोव्हेंबरला बलिप्रतिपदेच्या निमित्ताने छत्रपती संभाजी राजे चौक समिती हिवरा (संगम) तर्फे संभाजी राजे चौकात
शेतकर्यांचा राजा, समतावादी,उदारमतवादी सम्राट बळीराजा च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शेतकरी दयाराम भोयर यांचे चिरंजीव महेश भोयर यांची कनिष्ठ अभियंता पदावर नुकतीच जलसंपदा विभाग आर्णी येथे नियुक्ती झाल्याबद्दल समितीच्या वतीने शाल,पुस्तके,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी नंदकिशोर राऊत,अमोल जगताप,रणजीत पाटील कदम,दीपक कदम, अविनाश नरवाडे,रवी कदम,निलेश करमोडकर, विश्वजीत कदम,शिवम चव्हाण,हरिओम चव्हाण,मुकेश कदम,उमेश भोयर,सुधीर कदम, शुभम कदम,आशीर्वाद पारटकर यांच्यासह छत्रपती संभाजीराजे चौक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.



