ईतर

बिरसा ब्रिगेडच्या निवेदनाची दखल;अखेर आदिवासी महिला वाहकाचे निलंबन रद्द!

पुसद:कठोरतेने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या आदिवासी वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहक सविता ससाने यांचे चुकीच्या पद्धतीने झालेले निलंबन रद्द करण्याचा इशारा बिरसा ब्रिगेडने दिला होता. त्याची दखल घेत आगार व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी ससाने यांचे निलंबन रद्द केले आहे.

पतीच्या निधनानंतर एसटी महामंडळ पुसद येथे वाहक या पदावर कार्यरत सविता बाळकृष्ण ससाने या कार्यरत होत्या. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडत असताना आपली ड्युटी अगदी चोखपणे दिवस रात्र करतात. त्यासोबतच शेतातील कामात सुद्धा त्या अग्रेसर होत्या. धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून त्या सर्वश्रुत आहेत. तालुक्यातील महिला वाघीण म्हणून ओळख असल्याने एसटी महामंडळातील प्रवासी व कर्मचारी अधिकारी सुद्धा त्यांचा मान राखतात. यामुळेच ब्रिगेडच्या वतीने आदिवासी कर्तव्यदक्ष वाघीण म्हणून सविता ससाने यांचा सन्मान सत्कार केला होता. अशा आपल्या कर्तव्य तत्पर ड्युटी नंतरही त्यांना वेळेवर वाहन उपलब्ध न केल्यामुळे प्रवाशांची होते होत असलेली हेळसांड दूर करण्याच्या दृष्टीने ससाने यांनी वरिष्ठ अधिकारी यांना जाब विचारला असता नाहक पणे अधिकाऱ्यांनी तिचे निलंबन केले होते. ही बातमी बिरसा ब्रिगेडला कळताच ब्रिगेडने चुकीच्या निलंबनाबाबत जाब विचारून त्वरित निलंबन रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन 30 नोव्हेंबर 2023 रोजी देले होते. निवेदनाची दखल घेत आजार व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी कर्तव्यदक्ष महिला वाहकाची त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती घेऊन एका दिवसात निलंबन मागे घेण्याचा शब्द दिला. परंतु कुटुंबाच्या वैद्यकीय कारणास्तव एक तारखेला होणारे निलंबन रद्द चे आदेश आज 02 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले. बिरसा ब्रिगेडला आगार व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी दिलेला शब्द पाळून आदिवासी महिलेवरील अन्याय दूर करण्यासाठी निलंबन रद्द करण्याचे आदेश आज देऊन दिवसा ब्रिगेडने पुढील आंदोलन स्थगित करावे असे सांगितले. यावेळी बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे तालुकाध्यक्ष मारुती भस्मे व ब्रिगेडचे पदाधिकारी पंकज वंजारे, अक्षय व्यवहारे, विठ्ठल मिरासे, आतिश वाघमारे, अमोल डोईफोडे, अमोल हगवणे, विशाल चव्हाण यांनी आज मंगेश पांडे यांचे आभार मानले, व आंदोलन स्थगित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close