ईतर

डॉ.सतीश चिदरवार यांची लोकमत टाईमस च्या “आयकॉन्स ऑफ ऑफ सेंट्रल इंडिया” कॉफी टेबल बुकमध्ये नोंद!

पुसद : ‘लोकमत टाइम्स’ च्या ‘आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया’ या ‘कॉफी टेबल बुक’ चे सोमवारी नागपूर येथे लोकार्पण झाले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य भारतात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५२ मान्यवरांना लोकमत टाईमसच्या ‘आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुसद येथील नामांकित मेडिकेअर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ.सतीश चिद्दरवार यांनासुद्धा लोकमत टाईम च्या ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकमत टाइम्स या वृत्तपत्राच्या ‘आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया’ कॉफी टेबल बुक मध्ये मध्य भारतातील सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक औद्योगिक , वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील ५२ कर्तृत्ववान व्यक्तींची यशोगाथा मांडण्यात आली आहे.

डॉ.सतीश चिद्दरवार यांचे सामाजिक व‌ खाजगी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे.वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी पुसद येथे १५० बेड चे मेडिकेअर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल चालू आहे. जे यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात सर्वात मोठे ख्याती प्राप्त हॉस्पिटल आहे. येथे वेगवेगळे मेडिकल कोर्सेस सुध्दा चालू आहेत.तसेच येत्या काळात येथे नर्सिंग कॉलेज देखील चालू करण्याचा त्यांचा मानस आहे. शैक्षणिक क्षेत्रात पुसद मध्ये त्यांची ज्योतिर्गमय विद्यालय नावाची अग्रेसर शैक्षणिक संस्था आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये रोटरी क्लब, लॉयन्स क्लब , इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच इतर अनेक ट्रस्ट तर्फे त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.

त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना लोकमत टाइम्सच्या ,प्रतिष्ठित कॉफी टेबल बुक “आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया – २०२३” मध्ये समावेश करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामुळे डॉ.सतीश‌ चिद्दरवार यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close