ईतर

पुसद येथे हवेच्या कॉम्प्रेसरचा स्फोट ; या दुर्घटनेत कारागीराने गमावला हातांचा पंजा!

पुसद: शहरातील शनीमंदिरा जवळील राहुल सर्विसिंग सेंटरमधील दुकानात हवेच्या कॉम्प्रेसरचा स्पोट झाल्याने तिथे काम करणाऱ्या कारागिराचा मनगटा पासून हाताचा पंजा वेगळा झाला स्फोट एवढा जोरदार होता की मोठा आवाज होऊन आजूबाजूच्या दुकाना हादरा बसला.पोहचले. या घटनेमुळे परिसरात काही वेळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

या स्फोटात गंभीर दुखापत झालेल्या कारागिराचे नाव अब्दुल रहीम वय३५ वर्षे रा.गडीवार्ड पूसद असे आहे.

याबाबत प्राप्त माहिती १३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पुसद शहरातील शनीमंदिरा जवळील बस स्टँडच्या मागच्या बाजूला च्याभिंतीला लागून असलेले राहुल सर्विसिंग सेंटर टू व्हीलर दुरुस्ती करण्याचे दुकान आहे. अब्दुल रहीम वय३५ वर्षे हे नेहमीप्रमाणे सर्विसिंग सेंटर काम करण्यासाठी आला असता त्यांनी हवेचे कॉम्प्रेसर मशीन सुरू करताच मोठा स्फोट झाला आणि त्या स्पोटात काही कळण्याच्या आतच या कारागिरांच्या डाव्या हाताचा मनगटा जवळून संपूर्ण पंजा तुटून खाली पडला गंभीर जखमी झाले. स्फोट एवढा जोरदार होता की मोठा आवाज होऊन आजूबाजूच्या घरांना हादरा बसला. हा कारागीर मशीनच्या बाजूलाच होता. त्यामुळे त्याचा एका हाताचा पंजा पूर्णपणे गमवा लागला व पाय छिन्नविछिन्न झाला. गंभीर अवस्थेत या कारागिराला नागरिकांनी जवळच असलेल्या जाधव हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना परंतु प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना हलवण्याची सूचना जाधव डॉक्टरने दिल्याने नांदेड येथे रेफर केल्याची माहिती आहे.या घटनेमुळे परिसरात काही वेळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close