विजेच्या जिवंत तारेचा धक्का लागून बांधकामावरील मिस्त्रीचा जागीच मृत्यू!

पुसद : शहराला लागून असलेल्या निंबी येथील हरीमकर यांच्या दुमजली इमारतीच्या बांधकामांचे प्लस्टर करीत असतांना एका मिस्त्रीला विजेच्या जिवंत तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्या व्यक्तीस तात्काळ खाजगी रुग्णालयात पुसद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. राजेश प्रल्हाद अंभोरे अंदाजे वय ४०वर्ष हल्ली मुक्काम बोरगडी असे आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, राजेश हा मुळचा महागाव तालुक्यातील कान्हा येथील रहिवासी असून ते उदरनिर्वाह करण्यासाठी बोरगडी येथील त्याच्या सासऱ्यांच्या घरी म्हणजे प्रकाश भगत यांच्याकडे तीन वर्षांपुर्वीच राहात होता आणि बांधकामांवर मिस्त्री काम करीता होता आज दि.२ऑक्टोंबर२०२३ रोजी सकाळी १०ते१०:१५ सुमारास तो निंबी येथील हरिमकर यांच्या दुमजली इमारतीच्या बांधकामांवर प्लस्टरचे काम करीत असताना इमारतीच्या वरच्या भागाला असलेल्या विजेच्या जिवंततारेचा स्पर्श झाला व त्यांचा जागिच मृत्यू झाला तरीही त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी मृत्यू झाल्याची माहिती सांगितली यावेळी या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदना करिता दाखल करण्यात आला.पंरतु नातेवाईक फिर्याद दाखल करण्यासाठी वसनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले परंतु वृत्त लिहोस्तर वसंत नगर पोलिसांकडून रुग्णालयात शिवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती शिवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला परंतु या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला असून त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी दोन मुले,दोन बहिणी,भाऊ असा आप्त परिवार असल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



