ईतर

वीज कोसळुन बैल ठार; वनवारला शिवारातील घटना!

पुसद : दि.२९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटात आलेल्या वादळी पावसाने काही ठिकाणी नुकसान केले आहे. वनवारला येथील कोंढेश्वर मंदिराजवळील वीज पडल्याने शेतातील एक बैल ठार, झाल्याचे वृत्त आहे. हे बैल संतोष लक्ष्‍मण दवणे यांच्या मालकीचे आहे. तर जवळच गाडीच्या आसऱ्याला गेलेल्या दवणे कुटुंबातील चार सदस्य दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले आहे.सध्या ह शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यासह शेतात काम करीत होते. अशातच शुक्रवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, दवने यांनी जनावरे शेतातीलच एका झाडाला बांधून ठेवली होती पाऊस‌ सुरू असतानाच जोरदार कडकडणारी वीज झाडाखाली बांधलेल्या जनावरांवर पडली. यात एक बैल घटनास्थळीच ठार झाला, तर दैव बलवत्तर म्हणून जवळच गाडीच्या आस-याला गेलेले दवने कुटुंबातील चार सदस्य थोडक्यात बचावले.त्यात संतोष दवने यांची पत्नी कविता मुली राणी व समीक्षा व दहा वर्षीय मुलगा यश याचा समावेश आहे.’देव तारी त्याला कोण मारी’ चा प्रत्यय दवने कुटुंबाने अनुभवला.ही घटना समजताच तात्काळ गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तर याघटनेमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले असून पिडीत शेतकर्‍याला शासनाने तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close