सकल मराठा समाज बांधव महागावच्या वतीने सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-महागाव येथे आज शुक्रवार दि.८ सप्टेंबरला सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सरकारचा निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा शिवाजी चौक नवीन बस स्थानक येथून महागाव पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आली यावेळी अंतयात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा बांधव महागाव तालुका यांच्या वतीने करण्यात आले या अंत्ययात्रेची सुरुवात शिवाजी चौक येथे हजारो मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते .प्रतीकात्मक तिरडी तयार करून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचे प्रतीकात्मक छायाचित्र ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधी खूप मोठ्या घोषणाबाजी सुद्धा देण्यात आल्या “एक मराठा लाख मराठा..!” या सरकारचे करायचं का खालती डोकं वरती पाय..! “आरक्षण नाही कुणाच्या बापाचं ते आहे आमच्या हक्काच..! तहसील समोर ही तिरडी पोलीस प्रशासनाच्या वतीने ताब्यात घेण्यात आली. मराठा मोर्चेकरी समाज बांधव पोलीस स्टेशनच्या दिशेने आंतयात्रा पुढे घेऊन गेले तिथं अंतयात्रा समाप्त झाली .
महागावचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांना मराठा समाजाच्या उपोषण कर्त्यावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करणारे निवेदन सकल मराठा समाज महागाव तालुकाच्या वतीने देण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील कदम माजी जि. प. सदस्य, संदीप ठाकरे पाटील पं. स.सदस्य, शैलेश कोपरकर नगरपंचायत काँग्रेस गट नेते, गोविंदरावजी देशमुख राष्ट्रवादी
काँग्रेस तालुका अध्यक्ष, प्रवीण ठाकरे , शाखा उर्फ प्रमोद भरवाडे उपाध्यक्ष, तेजस नरवाडे शहर प्रमुख शिवसेना,सुनील नरवाडे नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष ,उदय नरवाडे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष ,डॉ. संदीप शिंदे मराठा सेवा संघ महागाव तालुका, दत्तराव देशमुख माजी जिल्हाप्रमुख शिवसेना,सुरेश देशमुख मा. सरपंच वाकोडी, संजय कोपरकर सामाजिक कार्यकर्ते, नितीन नरवाडे, अमर नरवाडे ,समाधान ठाकरे ,सतीश ठाकरे ,अतुल शिंदे, शिवाजी नरवाडे, समाधान राऊत, आकाश पानपट्टे, राजू पाटील, दिनेश नरवाडे,ओमकार देशमुख यांच्यासह महागाव तालुक्यातील आलेला सकल मराठा कुणबी समाजाचे शेकडो असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते पोलीस स्टेशन मध्ये दोन मिनिटं मोन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी चौख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.



