राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तेलचित्र परिसरात सौंदर्यकीकरनाचे भूमिपूजन!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम) :-महागाव येथील जुन्या बसस्थानका जवळील व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका सौ.करुणाताई शिरबिरे यांच्या प्रभागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तेलचित्र समोरील जागेवर पेवर ब्लॉक बसविणे कामाचे
भूमिपूजन आज शुक्रवार दि.२५ ऑगस्टला सकाळी १० वाजेदरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. सुनंदाताई दिलीपराव कोपरकर, उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे , बांधकाम सभापती गजानन साबळे, माजी नगराध्यक्ष सौ.करुणाताई शिरबिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी विशालजी पांडे युवासेना जिल्हाध्यक्ष,संभाजीराव नरवाडे, सुनील भरवाडे, विनोद कोपरकर संचालक बाबासाहेब नाईक सूतगिरणी ,सुजितसिंह ठाकुर, नारायण शिरबीरे, अमोल चिकने सरपंच संघटना तालुका अध्यक्ष महागाव, महेंद्र कावळे सर, मनोज भरवाडे, पत्रकार तथा साप्ताहिक लोकचिंतनचे संपादक गजानन वाघमारे, ज्ञानेश्वर ठाकरे, पवन रावते, श्रीकांत राऊत, राज पाटील, यांच्यासह नगरसेवक व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.



