यशवंत संघर्ष सेनेच्या पुसद तालुकाध्यक्षपदी सतीश मस्के यांची नियुक्ती

पुसद: जनहिताच्या संरक्षणासाठीआक्रमकपणे लढणाऱ्या यशवंत संघर्ष सेना या सामाजिक संघटनेच्या पुसद तालुकाध्यक्षपदी स्थानिक मुखरे चौक येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पार्वतीच्या बाळा गणेश मंडळाचे कोषाध्यक्ष सतीश शेषराव मस्के यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यशवंत संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे यांनी ही नियुक्ती केली आहे. सतीश मस्के यांना दि. १७ ऑगस्ट रोजी यशवंत संघर्ष सेना युवक प्रदेश अध्यक्ष किशोर काळदाते व संस्थापक अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे यांच्या सहिनीशी नियुक्तीपत्र देण्यात आले. संघटना वाढीस व बळकटीकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न तसेच समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर वाचा फोडून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सतीश मस्के आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना म्हणाले. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



