ईतर

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी व्हाँइस आँफ मिङिया पुसदच्या वतीने जाहीर निषेध!

पुसद : जळगावच्या पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. ह्या मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून या मारहाणीत संदीप महाजन हे गंभीर जखमी झाले आहे. पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील भ्याडहल्ल्या व्हाँइस आँफ मिङिया पुसदच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला असुन उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले असून संबंधित हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी व्हाँइस आँफ मिङिया पुसदच्या वतीने करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यावर त्यांची दुचाकी पाडून जबरदस्त मारहाण व शिवीगाळ केली.या मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन करता येणार नाही. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मिडीया पुसदच्या वतीने निषेध करण्यात आला आहे . याप्रकरणी संबंधित आमदार व त्याच्या कार्यकर्त्यांवर योग्य पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गंभीर दखल करण्यात यावी. तसेच दोषींना कडक शासन करण्यात यावे. व पत्रकार संदीप महाजन संरक्षण पुरविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य करून पत्रकारांशी असभ्य वागणूक देत असतील तर ही सत्तेची नशा चढली अशेच म्हणावे लागेलपत्रकार संदीप महाजन यांना फोन करून शिवीगाळ केली होती. किशोर पाटील यांना पत्रकाराला हात-पाय तोडण्याची धमकीही दिली होती. काही दिवसांपूर्वी याची ऑडियो क्लिपही व्हायरल झाली होती. या धमकीनंतर आता पत्रकाराला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अशा घटनेचा पुसद पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशाचे निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे सदर निवेदनावर व्हाँईस ऑफ मीडियाचे पुसद तालुका अध्यक्ष समाधान केवटे.कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे .उपअध्यक्ष दिनेश खांङेकर.मंगेश पारटकर.कार्याध्यक्ष मदन बङगुजर सरचिपणीस शं.का.माहुरे सहसरचिटणीस प्रा.अंबादास वानखेङे.कार्यवाहक यसवंत जाधव.संघटक रवि खरात.प्रसिध्दी प्रमुख अरुण बरङे.सदस्य अरविंद कांबळे अविनाश आखरे.पुरुषोत्तम सोङगीर.गुलाब वाहुळे.नंदकिशोर बंग.विजय चव्हाण.रविकांत सिंगनकर.प्रा.एस.एल, राठोङ.कुलदिप सुरोशे. यांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close