ईतर

जेष्ठ नागरिक विरंगुळा केन्द्र, पुसद येथे उद्या सुगम व शास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन!

पुसद: येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा केन्द्र, शनि मंदिर जवळ, मोती नगरमध्ये नादब्रम्ह संगित विद्यालय, पुसदच्या वतीने गुरू पौर्णिमा उत्सवा निमित्त शनिवार, दि.१५जुलै२०२३ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास,सुगम व शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गायक सुरमणी पंडित डॉ.धनंजय जोशी सर नांदेड यांचे शास्त्रीय व सुगम संगित गायन पुसदवासियां करिता आनंदाची पर्वणी ठरणार आहे.. सुरमणी पंडित डॉ.धनंजय जोशी सर हे भारतातील सुप्रसिद्ध गायक असुन त्यांनी विविध संगित समारोहात आपल्या गायनाच्या माध्यमातून त्यांनी नावलौकीक मिळविला आहे.सुरमणी पंडित डॉ. धनंजय जोशी सर हे आकाशवाणीचे ए ग्रेडचे आर्टीस्ट असुन त्यांनी २०१२ साली अमेरिकेचा शास्त्रिय गायनाच्या कार्यक्रमानिमित्य यशस्वी दौरा केला होता. तसेच त्यांना संगित नाटकासाठी महाराष्ट्र शासनाचे सुवर्णपदक सुध्दा प्राप्त झाले आहे. पुसद परिसरातील संगितप्रेमीसाठी हा कार्यक्रम पर्वणीच ठरणार आहे त्यामुळे सदर कार्यक्रमास संगीत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन नादब्रम्ह. संगीत विद्यालय, पुसदचे संचालक प्रमोदजी जैयस्वाल सर व प्रशांत आत्राम सर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close