ईतर

विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमला शालेय परिसर;विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलचा उपक्रम!

पुसद : स्वराज्याच्या पंढरी सोबतच शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसद नगरीतील विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आषाढी एकादशी साजरी केली.

यावेळी आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व समजून सांगण्यात आले आणि नंतर समाज प्रबोधनात्मक विविध संदेश देत वारी काढन्यात आली.
यामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी वृक्षदिंडी तसेच सुदृढ आयुष्य, आरोग्याचा संदेश देणारी आहार दिंडी नैतिक मूल्य व संस्कृतीचा संदेश देणारी मुल्य दिंडी आणि या सर्वांमध्ये सामावलेली विठू माऊली या दिंडीचे मुख्य आकर्षण होते.

वारकऱ्यांच्या रूपातील विद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनीनी आणि विठू माऊलीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांमुळे जणू काही वारीचे स्वरूपचं शालेय परिसरास लाभले होते. शालेय परिसरातून निघालेल्या या वारी मुळे विठू माऊलीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. सर्व विद्यार्थ्यांना वारीमध्ये सहभागी होता आले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्याची सांगड घालत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा यासाठीच असे विविध उपक्रम शाळेत वेळोवेळी राबविले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close