चंद्रशेखर रावण यांच्यावरील हल्ल्याचा निषेध; आझाद समाज पार्टीचे राष्ट्रपतींना निवेदन

हिंगोली /प्रतिनिधी: भीम आर्मी चीफ आणि आजार समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर रावण आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा आझाद समाज पार्टी हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने निषेध करून आझाद यांना सुरक्षा कवच देण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
याबाबत पोलिस अधीक्षक हिंगोली यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनानुसार चंद्रशेखर रावण आजाद यांच्यावर झालेला मनुवादी प्रवृत्तीने केलेला असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि चंद्रशेखर बाजार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. निवेदनावर, प्रदेश सचिव ॲड. रावण धाबे, जिल्हाध्यक्ष ॲड. सुनील बगाटे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वंभर पटवेकर, शहराध्यक्ष नाशेर शाह, आर.पी. ठाकूर, शहर महासचिव निशांत राऊत, राजू खंदारे, नितीन शिखरे, अमोल गायकवाड, रामेश्वर काळबांडे, सुनील कीर्तने आदी उपस्थित होते.



