गुन्हे उघड करण्यात पुसद शहर पोलीस जिल्हात’ अव्वल!

पुसद: मागील मे महीण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी घेतलेल्या क्राईम मिटींग मध्ये पुसद शहर पोलीस स्टेशन यांनी गुन्हे तपास व शोध कामगिरी मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून यवतमाळ जिल्हा पोलीस दलात पहीला कमांक प्राप्त केला. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड व अपर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप यांच्या हस्ते चाक व प्रमाणपत्र देवून पुसद शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, सहा पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार व डी.बी. प्रमुखः पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांची टीम पोहवा प्रफुल इंगोल, पोना दिन सक नाविक सूर्यवंत्री, पो. कॉ. सिध्दोधन भगत, पो. कॉ. वैजनाथ पवार, पो. कॉ. आकाश बाभूळकर यांना सन्मानीत करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रशसनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारच्या गुन्हयाचा मागील महीण्यात केलेल्या उत्कृष्ट डिटेकानची माहीती जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधून मागविण्यात येवून ज्या पोलीस ठाणे व अधिकारी यांनी पोलीस दलातील कौसल्यामध्ये टेक्नॉलॉजी, सायबर गोपनीय माहीती यांचा योग्य वापर करून अतिशय उत्कृष्टरित्या डिटेक्शन व तपास केलेला असेल त्याचा प्रत्येक महीण्याचा मिटींग मध्ये सन्मान केला जातो. मागील महीण्यात पुसद शहर पोलीसांनी अप क. ३३२ / २०२३ कलम ४५७, ३८० भा.द.वी. या गुन्हयातील ०२ मोबाईल व सोन्याचे गठण चोरणा-या आरोपीचा नात्रिकदृष्ट्या अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून २४ तासाचे आत सदर आरोपींस उमरखेड जि. यवतमाळ येथून शोधून काढून त्याचे कडून गुन्हयात गेलेला मुद्देमाल हस्तगत केला या कामगिरी करता तपासकामी योग्य ते मार्गदर्शन करणारे पोलीस निरीक्षक पांचाळ साहेब तपास करणारी टीम हा पोलीस निरीक्षक केदार साहेब व डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांची टीम गोवा प्रफुल इंगोले, पो.ना. दिनेश सोळंके, पोना विवेक सूर्यवरी पो कॉ सिध्दोधन भगत, पो. [कॉ] [वैजनाथ पवार, पोको आकाश बाभूळकर यांचा गुन्हे तपास व शोध कामगिरी मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी हा चाक देवून गौरव करण्यात आला आहे.



