शैक्षणिक

कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम

९९ टक्के गुण मिळवित सृष्टी बांडे विद्यालयातून प्रथम ५४ विद्यार्थ्यांनी मिळविले ९० टक्के पेक्षा जास्त गुण

पुसद: येथे शालेय संस्कार व उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत येथील कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांनी गुणांची नव्वदी पार केली आहे. सृष्टि मिलिंद बांडे हिने ९९ टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर अर्पिता अनिल करे हिने ९८.६० टक्के गुण मिळवीत दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. श्रुतिका सचिन त्रिवेदी हिने ९६.८० टक्के गुण मिळवित तृतीय स्थान पटकावले आहे.विद्यालयाचा शेकडा निकाल ९४.०७ टक्के आहे. शालेय शिस्त, नियमित वर्ग अध्यापन, शिक्षक पालक व संस्था पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे उत्कृष्ट निकालाची परंपरा काय ठेवता आली, असे मत मुख्याध्यापक सुरेश धनवे यांनी व्यक्त केले दाहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण तथा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान शाळा समिती सभापती बाळासाहेब उर्फ नरेंद्र गोधाजीराव मुखरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष राजेश कोटलवार तथा शाळा समिती सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.नियोजनबद्ध अध्यापन, अभ्यासातील सातत्य आवश्यक असल्याचे मत उपमुख्याध्यापक गजानन वायकुळे यांनी व्यक्त केले आहे.पर्यवेक्षक रिता बघेल यांचेसह सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी विद्यालयाचे योगदान मोठे आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close