ईतर

पुसद येथे गोरक्षक व गोशाळांचा होणार सत्कार!

पुसद: डॉ. हेडगेवार हे ९३ वर्षापुर्वी पुसद शहराच्या दौऱ्यावरअसतांना एका कसायाकडुन गोमातेचे रक्षण करून समाजापुढे आदर्श प्रस्तापित केले होता. या घटनेचे औचित्य साधुन रविवार दि. १६ जुलै २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास श्री गजानन महाराज मंगल कार्यालयात कार्यक्रम आयोजीत करण्यात येणारआसल्याची माहिती डॉ. सुनिल सुर्यवंशी संयोजक गोशाळा महासंघ महाराष्ट्र यांनीह दि.१३जुलै२०२३ रोजी दिपसंध्या हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी की, गोरक्षा स्थळी पूजन व गोरक्षकांचा सत्कार समारंभ गोशाळा महासंघ महाराष्ट्र व गोरक्षा स्थळी स्मारक समिती पुसद, जिल्हा यवतमाळ द्वारा आयोजित करण्यात आला आहे गोरक्षा स्थळी पूजन व गोरक्षक सत्कार समारंभ रविवार दि. १६ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजता श्री गजानन महाराज मंगल कार्यालय पुसद जिल्हा यवतमाळ येथे होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंदजी एकबोटे, पुणे, (संयोजक गोरक्षक शिव अभियान कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉ. पंकजजी जयस्वात पुसद ( जिल्हा संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शंकरजी गायकर, मुंबई (राष्ट्रीय सहमंत्री विश्व हिंदू परिषद) ॲड.मोतीसिंगजी मोहता, अकोला (अध्यक्ष गोशाळा महासंघ विदर्भ) कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. खासदार डॉ. अनिलजी बोडे, अमरावती (राज्यसभा खासदार) मा. शेखरजी मुंदडा, पुणे (अध्यक्ष गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य) सुनीलजी मानसिंगका नागपूर (सदस्य कामधेनु आयोग भारत सरकार) अशोकजी जैन, मुंबई (अध्यक्ष ममहाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा समिती महाराष्ट्र शासन कार्यक्रमाचे आयोजक डॉ. सुनील सूर्यवंशी, अमरावती (संयोजक- गोशाळा महासंघ महाराष्ट्र) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परम पूज्य डॉ. हेडगेवार जी यांनी जुुलै १९३० रोजी पुसद जिल्हा यवतमाळ येथे एका कसायाकडून गोमातेचे रक्षण करून समाजापुढे आदर्श प्रस्थापित केले होते त्या ठिकाणी गोरक्षा स्मारक निर्माण व्हावे व गोरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या गोरक्षकांचा व गोशाळा ट्रस्टी संचालकांचा सत्कार  होणार आहे.महाराष्ट्रात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा कायदा असून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर गोवंशाची हत्या होत आहे खूप मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक गोवंश भी होता आहे गोवंशाची तस्करी अन्य राज्यात होत आहे. थांबवण्या करिता अनेक गोरक्षक आपल्या जीवाची परवा न करता कार्य करीत आहे. गोमातेचे रक्षण करत करता वेळप्रसंगी अनेक गोरक्षकांवर हमले होतात. या सर्व गोरक्षकांना गोरक्षा कायदेवी योग्य माहिती व्हावी याकरिता मार्गदर्शन होणार आहे . या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान १० गोरक्षक सहभागी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ५०० पेक्षा जास्त गोरक्षक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सुर्यवंशी यांनी दिली. या पत्रकार परिषदेस डॉ. पंकज जयस्वाल, रवी स्यानचंदानी, मनोज सरवैय्या, वैष्णव ढोकणे भारतअण्णा पेन्शनवार, बालाजी कामीनवार आधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close