जमाते इस्लामी हिंद,पुसद तर्फे पत्रकारांचा सत्कार.

पुसद: येथे ६जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनानिमित्ताने पुसद जमाते इस्लामी हिंद,तर्फे पुसद मधील पत्रकार बांधवांचा सत्कार सैय्यद सलमान सरांच्या राहत्या घरी अरुण ले आउट मध्ये करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अलीयार खान जनाब होते तर मार्गदर्शक म्हणून शेख नईम सर होते. सरांनी उपस्थितीत पत्रकार बांधवांच्या कार्याचा प्रशंसा करण्यात आली सोबतच आजच्या काळात सामाजिक सलो लिख्याची अवशकता आहे तसेच समाजाला आज वास्तविक मांडणाऱ्या पत्रकारांची आवश्यकता आहे हे नमूद करण्यात आले. या कार्यक्रमात पत्रकार बंधू बळवंत मनवर ,राजेश ढोले भाऊ , समाधान केवटे,विजय निखाते,रविकांत शिंगणकर, कृषिकेश, शंकर माहूरे, कैलास सरवते,नरवाडे भाऊ, सिद्धार्थ कदम,हानिफ शेख,आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.या उपक्रमात प्रमुख उपस्थिती माणुसकीची भिंत या सामाजिक संघटनेची होती.आलेल्या सर्व सदस्यांचे आभार सय्यद सलमान सरांनी केले.



