राजकिय

पुसद विधानसभा निवडणूकीत कोण कुणाचा प्रचार करतोय, तेच कळत नाही; राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक यांची सरशी होणार तर विरोधकांना धक्का बसणार!

सुरवातीला ही निवडणुक अतिशय चुरशीची वाटुलागली पंरतु अखेरच्या टप्प्यात ही निवडणूक एकतर्फी झाली असून ॲड इंद्रनील नाईक यांचा विजय सुनिश्चीत मानला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलीय!

पुसद: विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलीय. सुरुवातीच्या टप्प्यात अतिशय चुरशीची वाटणारी निवडणुक तिरंगी चौरंगी लढत होते की काय.?असे वाटु लागले असतांना या गटातटाच्या राजकारणात कोण कोणाला मतदान करणार याचा केवळ अंदाज बांधला जात होता. सुरवातीला ही निवडणुक अतिशय चुरशीची वाटुलागली पंरतु अखेरच्या टप्प्यात ही निवडणूक एकतर्फी झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे त्यामुळे या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलीय ही निवडणूक पक्षीय पातळीवर न रहाता गटातटाच्या पातळीवर पोहोचली आहे.त्यामुळे राज्यात एक वातावरण आणि पुसद मतदारसंघात एक वातावरण अस चित्र सध्या या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार इंद्रनील नाईक यांचा विजय बहुमताने होईल असे वातावरण मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.गटातटाच्या राजकारणामुळे दरवेळी गाजवणारी निवडणूक यंदा थोडी जास्तच लक्षवेधी ठरली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षात जेंव्हापासून दुफळी निर्माण झाली तेंव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला हा मतदारसंघ नाईक कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परंतु नाईक कुटुंबातच मागील काही वर्षांपासून कुटुंबात अंतर्गत कलह निर्माण झाल्याने या नाईक विरोधी गटाला या मतदारसंघात आमदकीचे स्वप्न पडु लागले पंरतु या मतदारसंघात नाईक घराण्यावर श्रध्दा बाळगणारे व बंजारा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने हे विरोधक नाईक घराण्याची विटही हलवू शकत नसल्याने इंद्रनील मनोरराव नाईक यांचा विजय या निवडणुकीत सुखकर मानला जात आहे.तर नाईकांच्या पाठीशी खंबीरपणे बंजारा समाज उभा आहे तर दुसरीकडे महायुतील सर्व घटक पक्ष जोमाने कामाला लागले आहे. विरोधी उमेदवार कोण कुठला? कोणाचा? तुमचा की आमचा? अशा भानगडीत न पडता समाजाचे व महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांच कार्यकर्तेचं पदाधिकाऱ्यांच या सगळ्याचं ‘ठरलंय’ या मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार इंद्रनील नाईक यांनाच बहुमताने विजयी करायचं हे मतदाराचं ठरलं!

या मतदारसंघात नाईक कुटुंबांचे वर्चस्व 

कै.वसंतरावजी नाईक हे महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधी पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.१९५२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि नागपूर राजधानी असलेल्या मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचं उपमंत्रिपदही त्यांनी मिळवलं. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते पहिले महसूल मंत्री होते.१९६२ च्या निवडणुकीत मारोतराव कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महसूल खातं होतं. पण, कन्नमवारांचं निधन झालं आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा ही कै.वसंतरावराजी नाईक यांच्याकडे आली. ते १९७५ पर्यंत मुख्यमंत्रिपदी कायम होते. त्यांना पक्षातूनच आव्हान मिळालं आणि पुढे त्यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द संपली. त्यांच्या कारकिर्दीनंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे राजकारणात सक्रिय झाले होते.कै.सुधाकरराव नाईक यांनी काकांचा वारसा सुरू ठेवला आणि १९७८ पासून तर १९९०च्या निवडणुकीपर्यंत ते विधानसभेवर सलग निवडून गेले. पुढे हेच सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. पण, त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी कमी कार्यकाळ मिळाला. एकाच कुटुंबातून मुख्यमंत्री होणारी ही राज्यातली पहिली जोडी ठरली.कै.सुधाकरराव नाईक यांच्यानंतर त्यांचे भाऊ मनोहर नाईक यांनी १९९५ ला पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपदही मिळालं होतं. त्यानंतर १९९९ ला शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी सुधाकरराव नाईक यांनी शरद पवारांसोबत गेले.त्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडून लढवली होती. त्यातही त्यांचा विजय झाला. पुढे २००४ पासून तर २०१४ पर्यंत मनोहरराव नाईक यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण, २०१४ साली पुतणे ॲड.निलय नाईक यांच्या बंडखोरीचा सामना मनोहरराव नाईक यांना करावा लागला. पुढे याच ॲड.निलय नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.त्यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक मनोहरराव नाईक यांचा लहान मुलगा इंद्रनील नाईक यांच्याविरोधात लढवली.२०१९ च्या निवडणुकीत ॲड.इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) ८९,१४३, मीळाली तर ॲड.निलय नाईक (भाजप) ७९,४४२, ज्ञानेश्वर बेले (वंचित बहुजन आघाडी) ११,२५५पण, त्यावेळीही बंजारा समाजानं ॲड.निलय नाईक यांना साथ न देता मनोहर नाईक यांच्या मुलाला निवडून दिलं. नाईक कुटुंबातील उमेदवार उभा असताना सुद्धा इंद्रनील नाईक हे ९ हजार ७०१ मतांनी विजयी झाले कुटुंबातील उमेदवार उभा असताना तसेच विविध पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले तरीही मतविभाजन करूं शकले नाही तर या निवडणुकीत ॲड. इंद्रनील नाईक विजयी परंपरेचं राजकीय गणित बिघडु शकणार नाही असे राजकीय जाणकारांचे मत आहे.त्यामुळे या निवडणुकीत ॲड इंद्रनील नाईक यांचा विजय सुनिश्चीत मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close