ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उडदीच्या घाटात तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उडदीच्या घाटात दि.१४ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या सकाळी ४ :०० वाजण्याच्या सुमारास ग्रामीण पोलिस स्टेशनचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली एका तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह पडून आहे . त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेहाची प्रथमदर्शनीय पाहणी करताच हा अपघात नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले परंतु या भागात मृतदेह आढळल्याने आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सदर मृतदेहांची ओळख पटली असून सदर तरुण अनसिंग येथील रहिवासी असून भुसा मार्केटमध्ये व्यवसाय करीत होता.शेख सलमान शेख बिस्मिल्ला वय २१ वर्षे रा.अनसिंग असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे.या बाबत पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख सलमान व उबेर पठाण व त्याचे दोन ते तीन जण भागीदारीमध्ये अनसिंग येथे भुसा मार्केटमध्ये व्यवसाय करीत होते.दि.१३ ऑक्टोबर २०२३ रोजी अनसिंग येथील जाफर यांच्या गोदामात शेख सलमान सोबत उबेर पठाण ने पैशाच्या कारणावरून वाद निर्माण केला होता.त्यानंतर तीन ते चार जणांनी मिळून चाकूने गळा चिरून व त्याच्या शरीरावर सपासप वार करून त्याला ठार केले.त्यानंतर त्याचा मृतदेह पुसद तालुक्यातील पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उडदीच्या घाटामध्ये आणून फेकला होता. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अनोळखी मृतदेहांची पाहणी केली असता हा अपघात नसून घातपात असल्याची पोलिसांना शंका बळवली व मृतदेहांची ओळख पटवून तपासाची चक्र फिरवली असता आरोपींनी संगणमत करून त्याचा हत्या केल्याची उघड झाले असून या प्रकरणात एका आरोपीला नामे उबेर पठाण अजिज पठाण वय २१ वर्षे रा.अनसिंग असे अटक करण्यात आली असून सलमानच्या हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी मात्र राशन तस्करीतुन ही हत्या झाल्याची अनसिंग परिसरात चर्चा आहे. पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.