बेलोरा येथे पन्नास वर्षांपूर्वीच्या घराच्या मातीची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली!

पुसद: तालुक्यांतील माळपठारावरील बेलोरा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या चंद्रकलाबाई लक्ष्मण गडदे वय ६५ यांच्या घराची ५० वर्षा पूर्वीची दगडा मातीची जीर्ण झालेली भिंत आज सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली घरातील इतर व्यक्ती बाहेर असल्यामुळे थोडक्यात वाचल्या आहेत.त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घराची भिंत कोसळल्याने या कुटुंबास रहायला घर देखील राहीले नाही. मात्र या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, तालुक्यांतील माळ पठारावरील बेलोरा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या चंद्रकलाबाई लक्ष्मण गडदे वय ६५ यांच्या वर्षांनुवर्षे यागावातील रहिवाशी असुन मागील पन्नास वर्षांपासून हे कुटुंब दगड मातीच्या जीर्ण झालेल्या घरांत राहतात चंद्रकलाबाई च्या पतीचे ८ वर्षापूर्वी हृदयविकाराने निधन झाले ह्या एकट्याच घरी राहत होत्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांचे दोन मुले संतोष लक्ष्मण गडदे नाशिक येथे तर दुसरा मुलगा आनिल गडदे हा छत्रपती संभाजी नगर येथे पोटाची खळगी भरण्यासाठी गेले आहेत व चंद्रकलाबाई घरी राहून रोजमजुरी करून स्वतः चा उदरनिर्वाह करत होत्या पण त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले म्हणून त्याही मुलीकडे लसीना येथे गेल्या होत्या आज सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास शेजारी असलेले शंकर गडदे यांची मुलगी कु पायल शंकर गडदे (१८) ही धुणेधूत असतांना माघून एकदाच मोठा आवाज आल्याने पायल ने प्रसंगधान साधून पळ काढला त्यामुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही चंद्रकलाबाई ह्या भूमिहीन असून यांचे द्रारिद्ररेषेचे कार्ड असूनही त्या घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत.
गरिबाला हक्काचं घर मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे. मात्र, या योजनेचा लाभ गरीबांना नाही तर श्रीमंतांना मिळत असल्याच अनेक ठिकाणी समोर येत आहे. अशा गरीब लाभार्थ्यांना सोडून गावातील धनदांडग्यांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे चित्र आहे.मागील पन्नास वर्षांपासून दगड मातीच्या घरात राहायला असलेले गरीब ग्रामस्थ अद्यापही या योजनेपासून वंचित आहेत. अशा गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ कधी मिळणार हाच प्रश्न उद्भवतो परंतु पन्नास वर्षांपूर्वीच्या घरांची भिंत कोसळल्याने या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र यात गडदे परिवाराचे हजरोंचे नुकसान झाले आहे त्यामुळे या घटनेची माहिती शासन प्रशासन पंचायत समिती ग्रामपंचायत स्तरावर तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी संबंधित तलाठ्यांकडून तात्काळ घ्यावी व पंचनामा करून या गडदे कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.



