संविधानाने आम्हाला स्वातंञ्य,समता,बंधुत्व तथा जगण्याचे भान दिले—बाबाराव मडावी.

संविधानाने आम्हाला स्वातंञ्य,समता आणि बंधुत्व दिले.संविधानाने सामाजीक एकता दिली.राष्ट्रीय एकात्मताची तत्वे दिली.धर्मनिरपेक्षता,सामाजीक समता आणि ऊपेक्षीत घटकांना प्रगती साधण्याची संधी ऊपलब्ध करुन दिली.संविधानाने मानवी अधिकार बहाल करुन असामाजीक चालीरीती, ऊच्चनिचता,अस्पृष्यता,अंधश्रध्दा ,वाईट रुढी परंपरा यावर कायद्याचा अंकुश निर्माण केला.संविधानाने निर्भय जगण्याचे तत्व दिले.लोकशाहीला संविधानाने बळकटी देवुन माणसातला माणुस सशक्त केला.संविधानाने जनतेला जगण्याचे भान दिले.भारतिय संविधानाने विविधता असलेल्या या देशातील लोकांना एकञीतपणे लोकशाहीचे बळ दिले.जगात भव्य दिव्य असलेल्या लोकशाहीला समतेच्या तत्वावर बांधणारे भारताचे संविधान भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हातुन लिहल्या गेले आहे.संविधानावर देशातला माणूस झेप घेण्यासाठी लोकांनी लोकांना अर्पण केलेल्या संविधानाचा अंमल करावा असे मत साहित्यीक तथा समाजसेवी बाबारावजी मडावी यांनी व्यक्त केले.



