क्राइम

सांडवा -मांडवा परिसरात एका महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सांडवा-मांडवा रस्त्यालगत हनुमान मंदिरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर सोमवारी १० ऑगस्ट एका अज्ञात महिलेचे गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती त्यावेळी ही बातमी वाऱ्यासारखी परिसरातील पंचकोशीत पसरली होती त्यावेळी सांडवा येथील संजय सांडवकर पोलीस पाटलांनी सदर महिलेचा मृतदेह आढळून आल्याची खबर पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची प्रथम दर्शनीय पाहणी केली असता त्यांना त्या अज्ञात महिलेच्या गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केला असावा असे पोलिसांच्या लक्षात आले त्यावेळी पोलिसांनी पंचनामा केला असून महिलेच्या शरीरावर फिकट जांभळ्या रंगाचा ब्लाउज आणि लाल पांढऱ्या रंगाची साडी होती तिच्या डाव्या हातावर अस्पष्ट स्वरूपात ‘अलका’ असे नाव असून उजव्या हातावर सुद्धा ‘शशिकला’ चे नाव गोंदवलेले असुन तिच्या गळा चिरून तसेच डोक्यावर कोणत्यातरी जड वस्तूने मारून घाव घालून हत्या करण्यात आली असल्याने या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला त्यावेळी तात्काळ संबंधित महिलेची अखेर ओळख पटली असून सदर महिलाही वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवाशी असल्याची माहिती पोलीस चौकशीत निष्पन्न झाल्याने तिचे नाव अलका सुखदेव सोयाम रा. वसंत नगर असे आहे.सदर महिलेची गळा चिरून इतरत्र हत्या केली असावी व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या परिसरात फेकून दिला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. ही घटना कशी घडली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही परंतु शवविच्छेदन अहवाल व तपासातून सर्व स्पष्ट होईल’, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.या हत्येच्या घटनेमागील कारण तसेच हत्येमागील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पुसद ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close