शैक्षणिक

एकलव्य इन्फोरमॅटिक्स, इन्स्टिट्यूट येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी!

पुसद: येथील एकलव्य इन्फोरमॅटिक्स, इन्स्टिट्यूट येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एकलव्य इन्फर्मेटिक इन्स्टिट्यूट चे संचालक गुरु माहुरे प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते, सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मान्यवराच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक गुरु माहुरे यांनी सावित्रीबाई फुले ( यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना ते पुढे म्हणाले ‘सावित्रीबाईनी घेतलेला स्त्री शिक्षणाचा वसा तेंव्हाच यशस्वी होइल जेव्हा समाजातील सर्व – स्त्रिया शिक्षणाचा उपयोग योग्य निर्णय घेण्यासाठी करतील, अनुभवाने सिध्द होतील, सदसद‌विवेवबुध्दी जागृत असणं म्हणजे खर शिक्षण होय.कुणी तुम्हाला कमकुवत समजेल, या अगोदर तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व समजायला हवं, स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण घ्या, शिक्षणच माणसाचा खरा दागिना आहे.शिक्षण स्वर्गाचे दार खुले करतात, स्वतःला ओळखण्याची एक संधी मिळते हे समजून घेतलं तरच सावित्रीबाईच्या वाटेवरून चालता येईल आणि हिच त्यांच्याप्रती खरी आदरांजली असेल.संस्थेतील विद्यार्थ्यांनी राणी घड्याळे आणि ऋतुजा नवसागरे यांनी सर्वाचे स्वागत आपल्या स्वागत गीतातून केले, तर दिव्या राठोड हिने आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच राणी घड्याळ हिने सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष भाषणातून मांडला. ज्ञानेश्वर दोडके ह्याने स्त्रियांचे संघर्ष जीवन मांडले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाला लाभला होता.या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन कुणाल कांबळे यांनी केले. तर संचालन कु. पूर्णिमा माहुरे व आभार प्रदर्शन कु.साक्षी भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल माहुरे, आनंद मारकड यांनी सहकार्य केले. यावेळी संस्थेचे सर्व विद्यार्थी व मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close