बांधकाम कामगाराने गळफास घेऊन केली आत्महत्या; शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद: शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवीन पुसद परिसरात फिर्यादी आनंद नरेंद्र मुखरे यांच्या हवेली मध्ये दि. १८ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एका बांधकाम करणाऱ्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.पवन दिनेश राव भागवत वय २१ वर्ष रा. करजगाव ता.चांदूरबाजार जि.अमरावती असे कामगाराचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन पुसद येथील फिर्यादी आनंद नरेंद्र मुखरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या हवेली च्या मागील बाजूस लिफ्ट चे बांधकाम सुरू होते.या ठिकाणी बांधकाम कामगार मृतक पवन दिनेशराव भागवत हा दि. १८ जुलै रोजी दुपारच्या दरम्यान गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पुसद येथे पाठविला शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.सदर घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.



