ईतर

रोहयो विधिमंडळ समितीच्या पथकाकडून पुसद तालुक्यातील कामाची पाहणी!

समितीच्या धसक्याने फायलींंवरील झटकलेली धुळ गेली वाया!

पुसद: महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीचे रविवारी पुसद तालुक्यात आगमन झाले होते. ही समिती जिल्हास्थळी तीन दिवस राहून रोजगार हमी योजनांच्या कामांची फलश्रुती तपासणार आहे. शिवाय तालुक्यांतील वादग्रस्त कामांचीही चौकशी करू शकत होती. त्यामुळे तालुक्यातील तक्रारकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या तर या दरम्यान, समितीच्या धसक्याने जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने फायलींंवरील धूळ झटकून रेकॉर्ड अपडेट केले होते परंतु या समितीने तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीची पाणी करून आल्या पावले मागे गेल्याने समितीबद्दल तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद तालुक्यात राज्य विधीमंडळाची ‘रोहयो’ समिती ता. ११ ऑगस्ट २०२५रोजी दौऱ्यावर आली होती. समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्यासह वि.प.स.कीरण सरनाईक समिती सदस्य राजेश वानखेडे,कीशोर दराडे अधिनस्त अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ‘रोहयो’ समितीने पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांची तपासणी केली.व तालुक्यात ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेली रोजगार हमी योजनेची कामे आणि त्यावर झालेला निधी खर्च यासंदर्भात रोहयो समितीने माहिती घेतली.सर्वप्रथम या ‘रोहयो’वीधिमंडळ समिती पथकाचे तालुक्यातील ज्योतीनगर ग्रामपंचायतीमध्ये पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी समितीच्या सदस्यांकडून वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी कमळाकार, विनोद प्रभाकर इसळकर,सुभाष प्रभाकर इसळकर आणि रामदास सवाई राठोड याच्या घरकुलाच्या कामाची पाहणी केली व लाभार्थ्यांसोबत चर्चा करुन घरकुलचा लाभ घेतांना काही अडचन आली कां याची विचारणा केली तसेच घरकुलचे पुर्ण हप्ते आपणास मिळाले कां तसेच मग्रारोहयो अंर्तगत लाभ मिळाला कां या बाबत विचारणा केली असता लाभार्थ्यांनी घरकुल कामाचे सर्व हप्ते मिळाले व मग्रारोहयो अंतर्गत अकुशल मजुरी पुर्ण मिळाल्याचे सांगितले.पंरतु त्यावेळी गावातील नागरीक रमेश फकिरा चव्हाण व नामदेव भागवान सोळंके यांनी घरकुलचा लाभ मिळाला नसल्याचे सांगितले असते समितीच्या पथकाने त्यांची नोंद घेउन लाभ मिळण्याबाबत चौकशी करुन आपणास लाभ देण्यात येईल असे आश्वासन दिले.

नंतर समितीचे पथक पिंपळखुटा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेत शिवारातील फळबाग लागवाड (मोसंबी) कामावर भेट दिली असता लाभार्थी सुभाष राजाराम चव्हाण यांच्या सोबत चर्चा केली व किती ऐकर मध्ये लागवड करण्यात आली या बाबत माहिती घेतली असता लाभार्थ्यांने सांगितले की ५ एकर जमीनीवर मोसंबीची लागवड करण्यात आली असे सांगितले त्यावेळी समितीने शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माहिती घेतली व काती मुलंबाळं आहेत अशी विचारणा केली तसेच उत्पन्नात कशा प्रकारे भर घालता येईल याबाबत लाभाथर्थी सोबत चर्चा केली तसेच प्राकलणा नुसार देयके अदा करण्यात आले कां व आपणास लाभ घेतांना अडचण आली कां मागिल वर्षी किती उत्पन्न झाले या विषयी लाभार्थी सोबत चर्चा केली असता लाभार्थ्यानी मोसंबी फळबाग लागवाडमध्ये गेल्या वर्षी १६५०००० रुपये चे उत्पन्न मिळाल्याचे सांगितले तसेच मग्रारोहयो योजने अंतर्गत पहिल्या वर्षी ५०००० रुपये, मिळाले दुसऱ्यावर्षी ४१००० रुपये, मिळाले तिसऱ्यावर्षी ३०००० रुपये, मिळाले असल्याचे माहिती दिली.

त्यानंतर समितीचे पथक बांन्शी ग्रामपंचायती अंर्तगत स्मशानभूमीच्या आवारात वृक्षलागवड केली त्याची पाहणी करून गावचे सरपंच तसेच गावातील नागरिकांसोबत चर्चा केली व समीतीच्या सदस्यांकडून वृक्षरोपन करण्यात आले.नंतर चोंढी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेत शिवारातील फळबाग लागवड ( मोसंबी) पाहणी करून लाभार्थी शेतकरी बजरंगसिग महाविरसिंग ठाकुर यांच्या सोबत चर्चा करण्यात आली कामाच्या प्राकलणानुसार देयके मीळाले की नाही याबाबत विचारणा केली तसेच सदर लाभार्थीस घरकुलचा लाभमिळाला कां या बाबत विचारणा केली असता लाभार्थी यांनी घरकुलचा लाभ घेतला असुन काम सुरू असल्याचे सांगितले तसेच सिंचन विहीरीचा लाभ घेतला कां या बाबत विचारले असता लाभार्थी यांनी स्वताःच विहीरीचे काम पुर्वी करण्यात आले आहे असे सांगितले तसेच शेतामधील ठिबक सिंचन बाबत कुठल्या योजनेतून लाभघेण्यात आले कां या बाबत विचारणा केली असता लाभार्थी यांनी स्वताःच केल्याचे माहिती दिली.

त्यावेळी पुढे गहुली येथील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक आणि माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या समाधीस्थळाला भेट देउन त्यांना विनम्र अभिवादन करून हा दौरा संपन्न केला समिती जिल्हाला परत गेली.यावेळी पुसदचे तहसीलदार महादेव जोरवर, प्रकाश नाटकर उपमुख्य कार्यकारी अभियंता नरेगा विभाग जिल्हा परिषद यवतमाळ, नरेगा प्रोग्राम अधिकारी अमोल शंभरकर जिल्हा परिषद यवतमाळ, नरेगा गटविकास अधिकारी पंडितकर जिल्हा परिषद यवतमाळ, राष्ट्रवादी अजित पवार पक्षााचे जिल्हाााध्यक्ष क्रांती पाटील कामारकर,अमोल आंदेलवाड गटविकास अधिकारी पुसद साहेब गटविकास अधिकारी संजय राठोड, तालुका कृषी अधिकारी मुकाडे, कृषी सहाय्यक वन विभागाचे कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी तलाठी गायकवाड व गरिबी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पिंपळे साहेब पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर राठोड यवतमाळ जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियन संघटनेचे कार्याध्यक्ष टि.पी. राठोड, संबंधित ग्रामपंचायतचे अधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य अदि पदाधिकारी तसेच नरेगा नरेगा कर्मचारी रवी जाधव एपीओ वसंत चव्हाण एपीओ भारत राठोड तांत्रिक साहाय्यक सीडीओ आडे, खंदारे, तांत्रिक सहाय्यक विनोद मिराशे संजय राठोड सुभाष नाईक पवन शिंदे मयूर पवार उमेश राठोड व ग्राम रोजगार सहाय्यक संघटना व तालुका अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष पंजाब राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

रोहयो’विधिमंडळ समितीच्या पथकाने अधिकाऱ्यांच्या माहितीवर भरोसा करून दौरा केला समाप्त !

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात आलेली कामे यांपैकी काही कामे प्रत्यक्षात झाली नसताना कागदोपत्री दाखविल्याची चर्चा अनेक गावकऱ्यांमध्ये होती तशा काही तक्रारीही होत्या परंतु या विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीने केवळ अधिकाऱ्यांच्या माहितीवर अवलंबून ठराविक गावाची पाहणी करून या दौऱ्यातून काढता पाय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जर हा दौरा तालुक्यातील माळ पठार भागात किंवा इतर ठिकाणी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी गावकऱ्यांशीही थेट संवाद साधला असता तर मोठे घबाड मिळाले असते  अशी चर्चा सध्या पुसद तालुक्यात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close