मातोश्री माईसाहेब मुखरे प्रा.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षा वाघमारे यांना बेस्ट प्रिन्सिपल अवार्डाने सन्मानित!

पुसद: येथील मातोश्री माईसाहेब मुखरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षा राजेंद्र वाघमारे यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड न्यू दिल्ली यांचेकडून नुकताच बेस्ट प्रिन्सिपल अवार्ड घोषित झाला आहे. इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्या कडून सौ.वर्षा वाघमारे यांच्या शैक्षणिक कार्य व योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला असून त्यांना हा पुरस्कार नवी दिल्ली येथे दि, ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनी देण्यात येणार आहे. सर्व देशभरातील दीड लाख शाळांमधून १००० शाळांना हा पुरस्कार देण्यात येतो त्यातील सौ.वर्षा वाघमारे मॅडम हे देशातील एक हजार शाळांमधील एक मुख्याध्यापिका आहेत. पुसद सारख्या एका छोट्या तालुक्यातील शाळेला देशभरातील दीड लाख शाळांमधून बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळाला त्याबद्दल मुख्याध्यापक सौ.वर्षा वाघमारे मॅडम यांचे शिक्षक शिक्षकेतर व कर्मचारी वृंद तसेच समाज बांधवांकडून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.या इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड आवार्डाचे स्वरूप हे रुपये ५०००/रू नगदी, एक ५०००/रुपयाची सोनाटा घड्याळ व बेस्ट प्रिन्सिपल ट्रॉफी असे आहे याबद्दल त्यांना अनेक सामाजिक संघटनांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे..



