क्राइम

बातमी का लावली म्हणुन पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या गोमाफियावर गुन्हा दाखल!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या काळी दौलत येथे गोमाफीया तस्करांने बातमी का लावली म्हणुन पत्रकाराला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी घडली.. या बाबत सविस्तर वृत्त असे कि दिनांक २८ जुन रोजी मध्यरात्री उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद व ग्रामीण पोलीस पेट्रोलिंग करीत असताना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आरोपी शेख मतीन शेख अफसर हा कत्तलीसाठी बैलजोडी घेऊन जात असताना मिळुन आला, पोलीसांनी त्याची झडती घेतली व त्याचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये पन्नास च्यावर गोवंशाचे फोटो व त्याची किंमत मिळुन याला या प्रकरणी पोलिसांनी बैलजोडी जप्त करुन गोशाळेत पाठविली व आरोपी शेख मतीन शेख अफसर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(ए) व कलम ९ नुसार गुन्हा दाखल केला होता. या बाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहिती च्या आधारे दै,विदर्भ मतदार चे काळी दौ‌‌ प्रतिनधी ताहा मिर्झा‌ यांनी “काळी दौ येथे गोमाफीयाला तस्करी करताना पोलिसांनी पकडले” या मथळ्याखाली वृत प्रकाशीत केले होते, या बातमीचा राग मनात धरुन आरोपी शेख मतीन शेख अफसर व शेख शादुलला शेख अफसर दोन्ही रा, काळी दौ‌‌ यांनी पत्रकार ताहा मिर्झा‌ काळी दौ येथील एकता नगर जवळ उभे असताना दोन्ही आरोपींनी तु आमची बातमी का लावली असे म्हणत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली व तुला व तुझ्या कुंटुबातील सदस्यांना कापुण टाकतो आम्हाला गावातील अनेक गुंडाचा साथ आहे असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पत्रकार ताहा मिर्झा‌ यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने आरोपी शेख मतीन शेख अफसर (वय ३५) व शेख शादुलला शेख अफसर (वय ३२) दोन्ही रा, काळी‌ दौलत यांच्याविरुद्ध कलम ५०४,५०६, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close