राजकिय

पुसद नप निवडणुक प्रचाराच्या धामधुमीत सट्टा बाजारातही तेजी; मविआच्या नगरध्यक्षपदाच्या उमेदवारांचे दर सर्वात कमी, तर कमळ-राष्ट्रवादी(अप) -शिसेना (शिंदे) मागे! कुणाचा विजय, कुणाची बाजी.? कुणाचा पराभव होणार कुणाची प्रचारात आघाडी सट्टा बाजाराचा कौल कुणाला?

सुत्रांच्या माहितीनुसार मविआचे उमेदवार डॉ.नदीम यांच्या पंजाचा दर सर्वात कमी आहेत, तर कमळ आणी घडी त्यापाठोपाठ आहे.

पुसद : नगर परिषद निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच आहे. या निवडणुक प्रचाराच्या धामधुमीत सट्टा बाजारातही तेजी आली आहे. कुणाचा विजय, कुणाची बाजी.? कुणाचा पराभव होणार कुणाची प्रचारात आघाडी सट्टा बाजाराचा कौल कुणाला..? असे तर्क वितर्क लावले जात आहेत. शहरातील अटीतटीच्या या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे डॉ.नदीम, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे अधिकृत उमेदवार सौ. मोहिनी इंद्रनील नाईक, भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार निखिल चिद्दरवार, शिवसेना शिंदे गटाचे ॲड.अनिल ठाकूर,या उमेदवारांच्या नावाभोवती सट्टा बाजार गरम असल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेच्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवार तर १५ प्रभागांमध्ये३१ नगरसेवक पदाच्या जगासाठी १३४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीतील सहकारी पक्षाने युतीला तडा देऊन स्वबळावर निवडणुक लढवीत असल्याने राष्ट्रवादी (अप) पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे, यांच्यामध्यें मुख्य लढत होणार असून येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होईल तसेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील व बहुमत कोणाला मिळणार आगामी ३ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार असले तरी निकालापूर्वी सट्टाबाजार तापला आहे.परंतु सध्या सट्टा बाजाराच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार महाविकास आघाडीलाच बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी अंतिम निकालापूर्वी खात्रीने काहीही सांगणं चुकीचं ठरेल.यंदाच्या या निवडणुकीत मतदानाचा नवीन उच्चांक निर्माण झाला असल्याने यासंदर्भातील आज चित्र स्पष्ट नसले तरीही प्रचाराच्या धामधुमीत निवडणुकीपूर्वी विविध ठिकाणी पैजा लागल्या आहेत. सट्टेबाजारही तेजीत आहे. याचे कारणही तशी आहे.यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार प्रचार मोहीम राबवली आहे. दुसरीकडे महायुतीतील सहकारी मित्रपक्ष एकमेकांसमोर ठाकले आहे. त्यामुळे सर्वत्र चुरशीची लढती निर्माण झाल्या आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, शहरातील या निवडणुकीचा निकाल धक्कादायक ठरु शकतो. २०१६ च्या तुलनेत काही वेगळा निकाल पाहायला मिळू शकतो. अशीच सध्याचे चित्र दिसतेय. यंदाच्या निवडणुकीत महायुतीतील सहकारी पक्षामध्ये भाजप-शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप)हे पक्षामध्ये निवडणुकीआधी उभी फूट पडली. तर महाविकास आघाडीने निवडणुकीपूर्वी आघाडी करून जोमाने प्रचार करीत आहे. परंतु आजच्या व मागच्या दहा वर्षांपूर्वीची परिस्थिती राहिली नाही मागच्या निवडणुकीत प्रस्थापित घराण्याला भाजपाने अटीतटीची टक्कर दिली होती. त्यावेळेसच्या नप निवडणुकीत ३४७८०वैध मतांची संख्या होती. त्यावेळी माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या धर्मपत्नी सौ.अनिताताई मनोहरराव नाईक यांना १४९१५ मते मिळाली होती तर भाजपाच्या डॉ.अर्चना अश्विन जयस्वाल यांना १२८८७ मते मिळाली होती व काँग्रेसच्या शुभांगी पानपट्टज यांना ६४०७ मते मिळाली तसेच ५०८ मतदारांनी नोटाचा वापर केला होता आणि सौ.अनिताताई मनोहरराव नाईक ह्या २०२८ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी आजच्या महाविकास आघाडीतील सहकारी पक्षातील अनेक मातब्बर नेते व शहरातील इतरही ज्येष्ठ नेते राजकीय पुढारी तसेच मुस्लिम बांधव सुद्धा नाईक घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि भाजप व शिवसेना विरोधात होती तरीही प्रस्थापित सत्ताधाऱ्याच्या कानाजवळुन गोळी गेली होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत ति स्थिती नाही.? कुंटबातच विरोध आहे. मागील निवडणुकीत मित्र असलेले आज विरोधात आहे. महायुतीतील मित्रपक्ष विधान सभेच्या निवडणुकीत प्रस्थापित झालेला भक्कमपणे साथ दिली होती परंतु कार्यकर्त्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांने दगा केल्यामुळे महायुतीतीच्या धर्माला तडा गेल्याने थोडी काही मित्रत्वाताची जाण ठेवणाऱ्या मतदारांनाही घराणेशाही कुटुंबावर खुल्लेआम नाराजी दाखवली असून सत्ताधाऱ्यांनी या शहराचा सातबाराच नावावर करून घ्यावा अशी चर्चा करीत आहे. तर सत्ताधाऱ्यांनी आपल्याच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना उमेदवारीतून डावल्यामुळे त्यांनी सुद्धा बंडखोरी केली आहे त्याचाच परिणाम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांवर होणार असून या निवडणुकीच्या निकालात मोठा उलटफेर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडुन वर्तविण्यात येतआहे. अशी चर्चा सुरु असतानाच सट्टा बाजार तेजीत आहे. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, महाविकास आघाडीला यावेळी बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली असली तरीही अंतिम निकाल ला पूर्वी खात्रीने काही सांगता येणं चुकीचे ठरेल. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. मोहम्मद नदीम यांच्यात व भाजप चे उमेदवार निखिल चीद्दरवार यांच्यात ‘काँटे की टक्कर’ होईल, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी(अप) व तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सट्टा बाजारात काल मंगळवारी डॉ.नदीम यांचा भाव ८५ तर भाजपच्या उमेदवार निखिल चिद्दरवार यांचा भाव १३५ राष्ट्रवादी (अप)च्या उमेदवाराचा २५० भाव शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाव ५ असा आहे. मात्र कही जाणकारांनी अजूनही याबाबत गुप्तता बाळगली असुन जशी जशी मतदानाची तारीख जवळ येईल आणखी ते भाव उघड करतील असे सांगण्यात येत आहे. २ डिसेंबर रोजी रात्री मतदानाची अंतिम टक्केवारी आल्यावर किती सट्टेबाजांनी पैज लावली याची जोरदार उलाढाल होणार असल्याचे सट्टा बाजारातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.यंदाच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीने राजकीय समीकरणे जुळवावी करुन जोरदार प्रचार मोहीम राबवल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची होणार हे चित्र मात्र स्पष्ट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close