राजकिय

पुसद मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सूतोवाच!

पुसद : राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षबांधणीसाठी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी एक सप्टेंबरला गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुलात सकाळी ११ वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचे प्रांताध्यक्ष ॲड. आशिष देशमुख यांनी मंगळवारी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यात शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही एकजूटपणाने प्रयत्न करणार आहोत. आजपर्यंत त्याच त्याच कार्यकर्त्यांना संधी मिळत होती. आता नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा उभारी मिळण्यासाठी आम्ही सर्वजण शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, अशी ग्वाही अँड आशिष देशमुख यांनी दिली.या पञकार परिषदेला अशोक बाबर, साहेबराव ठेंगे, नाना जळगावकर, सुरेश धनवे , फईम अहमद, प्रा.शिवाजी‌ राठोड, साहेबराव पाटील,साकीब शहा,नाना जळगावकर, दीपक जाधव, नितीन पवार व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.दि.१सप्टेंबर रोजी गुणवंतराव देशमुख विद्यालयात होणाऱ्या बैठकीत येथील राष्ट्रवादी काँग्रेस ची वाटचाल निश्चित होणार आहे.

आमदारांचा निर्णय आम्हाला अमान्य..              पुसदच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता व कोणतीही चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेऊन अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यांचा हा निर्णय आम्हा कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यांचेसोबत व्यक्तिगत कोणतेही वैर नसून केवळ वैचारिक मतभेद आहेत, मागील २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत. पुढेसुद्धा राहणार, असा विश्वास पत्रकार परिषदेत प्रा. शिवाजी राठोड, सुरेश धनवे, अशोक बाबर यांनी व्यक्त केला.

शरदचंद्र पवार साहेब लवकरच जिल्हा दौऱ्यावर येणार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आढावा घेण्यासाठी ऑक्टोबर किवा नोव्हेंबर महिन्यात यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह मिळेल किंवा नाही याचा विचार न करता पक्षबांधणीसाठी कार्यकत्यांनी कामाला लागावे, असा आदेश त्यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीमध्ये जनता विरोधकांना धडा शिकवेल. पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये युवकांना अधिकाधिक संधी देण्यात येणार आहे. त्याच दृष्टीने एक सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सर्व जातीधर्माचे, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असलेले कार्यकर्ते प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार आम्ही सर्वजण महाविकास आघाडीसाठी काम करणार आहोत असे अँड आशिष देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close