क्राइम

दोन जिवंत काडतुसह अग्निशस्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद; वसंत नगर पोलीसांची मोठी कामगिरी!

पुसद : शहरातील दोघांनी अग्निशस्त्र हैदराबादच्या युवकास विकल्याची घटना नुकतीच वसंत नगर पोलीस स्टेशनच्या कारवाईतून समोर आली आहे. जिवंत दोन काढतुसासह अग्निशस्त्र जप्त करण्याची मोठी रिवार्डेड कामगिरी वसंत नगर पोलिसांनी केली आहे. अग्निशास्त्र बनविणे, विक्री करणे आणि बाळगण्याच्या अनेक घटना घडूनही पोलिसांकडून अशा गुन्हेगारांवर वचक बसविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा वापर का केला जात नाही? असाही प्रश्न यानिमित्ताने गुन्हेगारी वर्तुळात विचारल्या जात आहे.

पोलीस स्टेशन वसंतनगर, पुसद, यांची अवैध्य हत्यार बंदी विरुध्द कारवाई ०३/०१/२०२४ रोजी रात्री 9 वाजेदरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत एक संशयीत ईसम हा मेडीकेअर हॉस्पीटलच्या मागे वारको सिटी भागात कमरेला गावठी कट्टा लावुन फिरत असल्याबाबत माहीती मिळाल्याने पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव मोहंमद मजहर उद्दीन मोहंमद नियाज उद्दीन, वय २१ वर्षे, रा. अमन नगर (अ), कुलसुम मस्जिद, हैद्राबाद असे असुन त्याचेकडून 20 हराराची एक गावठी बनावटीची पिस्टल व 2 हजाराचे दोन जिवंत काडतुस असा मुद्देमाल मिळुन आला. तसेच सदरचा मुद्देमाल अमजद खान सरदार खान व सरदार खान अमीरउल्ला खान, दोन्ही रा. वसंतनगर, पुसद यांचेकडुन २ ते अडीच वर्षापुर्वी खरेदी केला असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी दिली आहे. या घटना प्रकरणी अपराध क्रमांक ०३/२०२४ कलम ३/२५ भारतीय हत्यार कायद्याचे कलमाप्रमाणे तिन्ही आरोपीविरुध्द गून्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधिक्षक पंकज अतुलकर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदसिंग सोनोने, तसेच वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण नाचणकर यांचे आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक देविदास पाटील व गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक चव्हाण व मुन्ना आडे, पोलीस नायक संजय पवार व सलिम शेख यांनी यशस्वीरित्या पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close