पुसद भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी अश्विन भैय्या रमेशलालजी जैस्वाल यांची नियुक्ती!

पुसद :भाजपा जिल्हा कार्यकारिणीत हिंदूत्ववादी चेहरा सामाजिक कार्यकर्ते तथा शहरातील जमीन विकासक एम.के.कापड शोरूचे सर्वेसर्वा विद्यमान संचालक अश्विन भैय्या जैस्वाल यांची पुसद भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेने पुसद भाजपाच्या जिल्हाध्यक्षा डॉ.सौ.आरतीताई फुपाटे यांनी या संघटनात्मक नियुक्तीची घोषणा केली असून या निवडीचे अधिकृत पत्र त्यांच्या हस्ते अश्विन भैय्या जैस्वाल यांना देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.पुसद जिल्हात व मतदारसंघात भाजपची विचारधारा सर्वसामान्यांसह तळागाळामध्ये पोहचवून भाजप संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना जिल्हाध्यक्षांची यावेळी दिल्या आहेत.त्यामध्ये अश्विन भैय्या जैस्वाल यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली तरीही ते सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात. यापूर्वी २०१६मध्ये सुद्धा पूसद नगर परिषदेची निवडणूकीत त्यांच्या सौभाग्यवतीना निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या बलाढ्य उमेदवाराच्या विरोधात रिंगणात उतरविले होते त्यावेळी त्यांचा अल्पमतांनी पराभव झाला होता परंतु सत्ताधारी पक्षाला या निवडणुकीत जेरीस आणले होते मतदार संघातून ते सदस्य म्हणून त्यामुळे त्यांना मतदासंघासोबत शहरातील उच्चभ्रू वस्तीसह झोपडपट्टीतील रहिवाशांच्या समस्यांचा दांडगा संपर्क असुन तळागाळातील समस्यांचे ज्ञान आहे त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे येत्या काळात भारतीय जनता पक्षाला त्यांचा हे अनुभव कामी पडणार असून पक्षबांधणी व बळकटी करण्यासाठी फायदाचा ठरणार आहे.अश्विन भैय्या जैस्वाल यांच्या या नव्या निवडीचे श्रेय माजी आमदार मदनभाऊ येरावार, भाजपा संघटन मंत्री दिनेशजी सूर्यवंशी पुसद भाजपा जिल्हाध्यक्षा डॉ.सौ.आरतीताई फुपाटे, नितीन भुतडा जिल्हा समन्वयक भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा, विश्वास भवरे, योगेश राजे,अजय पुरोहित रवी ग्यानचंदानी, भाजपा जेष्ठ नेते विनोद जिल्हेवार, पुसद जिल्हा सरचिटणीस दिपक परीहार, यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अश्विन भैय्या जैस्वाल यांनी आपल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार मदनभाऊ येरावार भाजपा संघटन मंत्री दिनेश सूर्यवंशी पुसद जिल्हाध्यक्षा डॉ.सौ.आरतीताई फुपाटे, नितीन भुतडा जिल्हा समन्वयक भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा, यांनी विश्वास दाखवून दिलेल्या जबाबदारीबद्दल त्यांनी वरिष्ठांचे आभार मानले आहेत.



