ईतर

गायमुख नगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मोबिन अहेमद मजिद खान यांची बिनविरोध निवड ; दाह महिन्यांनंतर दुसरे उपसरपंच

पुसद: तालुक्यातील दुसऱ्या नंबरच्या गायमुख नगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मोबिन अहेमद मजिद खान यांची बिनविरोध निवड झाली आहे. मोहम्मद वसी अब्दुल लतीफ यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे उपसरपंच पद रिक्त होते.आज सोमवार दि. १३ जानेवारी२०२५ रोजी कार्यालयीन वेळेत तहसीलदार पुसद यांच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. सरपंच सौ.सुनिता मदन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सकाळी१०वाजता उमेदवारी नामनिर्देशनपत्र वाटप करण्याची वेळ होती यावेळी मोबिन अहेमद मजिद खान या उमेदवारांच एकमेव नामनिर्देशित

पत्र आल्याने अध्यक्षा सौ.सुनिता मदन गायकवाड व सर्व सदस्यांनी एकमताने मोबिन अहेमद मजिद खान यांची निवड केली. यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी मस्के, तलाठी निरंजन वानखेडे,गायमुख नगर ग्रामपंचायतीचे अध्यसी अधिकारी सौ.सुनिता मदन गायकवाड, ग्रामविकास अधिकारी टि.पी.राठोड सर्व सदस्य गण व कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.उपसरपंच पदी मोबिन अहेमद मजिद खान यांची बिनविरोध निवड झाल्याने उपस्थित ग्राम सदस्य गण व कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थांनी नवनियुक्त उपसरपंचाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, सत्तापक्षातील एका सदस्याने आपल्याला उपसरपंच पद मिळावे यासाठी खुप आटापिटा केल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close