राजकिय

पुसद भाजपामध्ये आयाराम गयारामाचं‘इनकमिंग’जोरात ; ज्यांच्याविरोधात हयात घालवली, त्यांचाच जयजयकार करण्याची या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर वेळ आल्याने निष्ठावंत मात्र कोमात!

भाजप प्रवेशासाठी अनेकांनी देव सोडले पाण्यात..

पुसद : भाजपामध्ये सध्या आयाराम गयारामचे वारे जोराने वाहू लागले आहे. काहींची घरवापसी सुरू तर तर काहींना आपल्या राजकीय जीवनात नको ते केलेल्या कामाचे शुद्धीकरणासाठी तसेच काहींना पॉलिटिकल करिअर घडवायचे आसल्यामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे.भाजपही अशा इतर पक्षांतील या नेत्यांना व कार्यकर्त्यांना मोठ्या आदराने सामावून घेत आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे.ज्यांच्याविरोधात हयात घालवली, त्यांचाच जयजयकार करण्याची या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर वेळ आली आहे.मागच्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. यात नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा समावेश होतो.सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची मागच्या काही दिवसांपासून तयारी सुरु केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व मिळवण्याच्दृया दृष्टीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून रणनिती आखली जात आहे. सत्ता आणण्यासाठी भाजप पूर्ण ताकद पणाला लावेल अशी अपेक्षा असून भाजप सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार आहे. त्यामुळे पुसद जिल्हा भाजपात मोठ्य घडामोडी घडत असून आयाराम गयारामचे वारे वाहू लागले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय परिस्थितीची झलक दिसते आहे.तर एकीकडे महाविकास आघाडीतून आऊट गोईंग काही केल्या थांबलेले नाही. दुसऱ्या पक्षातले बडे नेते पदाधिकारी कार्यकर्तेच भाजपमध्ये सध्या इनकमिंग जोरात करीत आहेत. पुसद शहरात महायुतीचे सहकारी पक्षामध्ये चढाओढ असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुसद नगर परिषदेवर भाजपला कमळ फुलवायचे आहे. त्यासाठी सगळी गोळाबेरीज सुरू आहे. अनेक माजी नगरसेवक, नेते, पदाधिकार्‍यांसाठी भाजपने दार सतत उघडं ठेवलं आहे. जो येईल तो आपला, अशी हाक भाजपाने दिली आहे. त्यामुळे पुसद शहराच्या राजकारणात एकामागून एक हादरे बसत आहेत.तर अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून पक्षप्रवेश करीत असल्याने जुन्या भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी मात्र कोमात गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आयाराम गयारामांना भाजपात मोठ्या आदराने सामावून घेतले जात आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे.अनेक संकटात हे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजपवरची निष्ठा ढळू दिली नाही उलट प्रस्थापित सत्ताधारी नेत्यांना सळो की पळो करून सोडले त्यांच्यावर कायम टीका केली. परंतु, येणारा काळ या निष्ठावान पदाधिकारी कार्यकर्ते व नेत्यांसाठी त्रासदायक ठरणार, असंच दिसत आहे.स्थानिक पातळीवर उभी हयात ज्या प्रस्थापित सत्ताधारी नेत्यांवर टीका करण्यात घालवली, आज त्यांचाच जयजयकार करण्याची वेळी या निष्ठावंतांना आली आहे. पक्षांतर करूनही भाजपमध्ये दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या शत्रुच्या कार्यक्रमांचे नियोजन या कार्यकर्त्यांनाच करावे लागणार आहे. ज्यांच्या विरोधात हयात घालवली, त्यांचाच जयजयकार करण्याची कार्यकर्त्यांवर वेळ आल्यामुळे भाजपने देखील विरोधी पक्षांतील किती नेत्यांना पक्षात सामावून घ्यायचे हे निश्चित करावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जशा जवळ येतील, तसे आणखी पक्षात इनकमिंग वाढण्याची भीती निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटत आहे तर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील अनेक माजी नगरसेवक वेटिंगवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुसद मतदार संघात राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहेत. पूर्वीच्या भाजपमध्ये तुरळकअपवाद वगळता निष्ठावंतांना संधी असेच भाजपचे धोरण होते परंतु आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाचे धोरण बदलले आहे.मात्र आता नव्या भाजपमध्ये मूळ, निष्ठावंतांची ठरवून ‘काशी’ केली जातेय. आयाराम गयाराम या इनकमिंगवाल्यांना मुद्दाम ‘तुपाशी’ ठेवले जात आहे. पुसद जिल्हा भाजपमध्ये नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर आपली खदखद व्यक्त केली आहे.हे किती दिवस चालेल? स्थानिक पातळीवर प्रस्थापित घराण्याच्या विरोधात राहून पक्ष वाढविला व जिवंत ठेवला त्याचा विसर पक्षाला पडला,’ असे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीची तीव्रता भाजपात  वाढल्याने चित्र असून ‘आयाराम गयाराम’ यांच्यामुळे निष्ठावान कोमात गेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close