गायमुख नगर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची बातमी प्रकाशित होताच जळफळाट!

पुसद : शहरापासून जवळच असलेल्या पुसद पंचायत समिती अंतर्गत असलेल्या दुसऱ्या नंबरची गायमुख नगर ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालकाला वारंवार जाती द्वेषातून मानसिक छळ करीत असलेल्या तक्रारीची काही वृत्तपत्रात व सा.समाज मुद्रा व झेप न्यूज ने बातमी प्रकाशित करताच वादग्रस्त महीला ग्रामविकास अधिऱ्यानी जळफळाट करून काही तथाकथित पत्रकाराला हाताशी धरून तक्रारकर्ता संगणक परिचालक व आपल्याच कार्यालयातील जेष्ठ ग्रामविकास अधिकाऱ्या बाबत अपशब्द वापरीत पत्रकार परिषद आयोजित करून बेछुटपणे खोटे आरोप केले आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, गायमुख नगर ग्रामपंचायत मध्ये नुकताच अर्धवट कार्यभार स्वीकारलेल्या वादग्रस्त महीला ग्रामविकास अधिकारी ह्या ज्या ग्रामपंचायतीचा कार्यभार स्वीकारतात त्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त असतात. यापूर्वीसुद्धा त्यांनी ज्या ग्रामपंचायत मध्ये काम पाहिले त्या ग्रामपंचायत मध्ये हेगडी, काढला वडसाद, अदी पदाधिकाऱ्यां सोबत वाद निर्माण केला होता. तर कारला ग्रामपंचायत मध्ये शासनाचा पगार असताना सुद्धा स्वतःला कामे करायचे असल्याने पदाधिकाऱ्या पुढे वाद घातला होता त्यामुळे तेथील पदाधिकाऱ्यांनी हे ग्रामसेवक बदलले तर काही ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालकांना सुद्धा यांना त्रास दिला आहे. तर एका ग्रामपंचायतीमध्ये चक्क सरपंच बाईच्या पतीदेवाच्या विरुद्धच खोटा एफ.आय.आर दाखल केला असल्याचा या महिला ग्रामविकास अधिकाऱ्याचा इतिहास आहे.. सदर ग्रामविकास अधिकारी ही “वासरात लंगडी गाय शहाणी” या म्हणी प्रमाणे आहे.गायमुख नगर ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक पदावर कार्यरत असलेल्या परिचालकाने दि.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी गायमुख नगरच्या महीला ग्रामविकास अधिकारी ह्या रुजू झाल्या तेव्हापासून जाणीवपूर्वक संगणक परिचालकास ‘कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ बसून रहा , सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामावर बोलविणे ,इतर कर्मचाऱ्यांदेखत घालून पाडून बोलणे ,जाती द्वेषातून अपमान जनक वागणूक देणे’ असा मानसिक छळ करीत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद व संबंधित विभागाकडे केली होती. परंतु या तक्रारीवर गटविकास अधिकाऱ्यांनी आज पर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने या तक्रारीच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होताच या ग्रामविकास अधिकाऱ्याना बातम्या इतक्या झोंबल्या की त्यांनी चक्क काही हस्तक तथाकथित पत्रकाराला धरून मंगळवार दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी महत्त्वाचा विषय असल्याचे सांगून दुपारी ३:०० वाजता गायमुख नगर ग्रामपंचायती मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.काही तथाकथित पत्रकारांनी हा मेसेज सन्माननीय पत्रकार बांधवांच्या ग्रुप वर शेअर केला व फोन सुद्धा केले. परंतु या विषयाकडे निस्वार्थपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांनी पाठ फिरवली.या ग्रामपंचायतीचा कारभार स्वीकारल्यापुर्वी या महिला ग्रामविकास अधिकाऱ्याची पहिली ऑर्डर पार्डी ग्रामपंचायती मध्ये झाली होती. त्यावेळी त्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी वादग्रस्त ग्राम विकास अधिऱ्याला विरोध केला.त्याच ग्रामपंचायत मधील आपला सहकारी ग्रामविकास अधिकाऱ्यावर या महिला ग्राम विकास अधिऱ्यानी तुमचा काही भ्रष्टाचार असल्यामुळे प्रभार देत नसल्याचा आरोप केला होता. त्यावेळी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्याला हाताशी धरून व पतीदेवाच्या ओळखीचा फायदा घेऊन गायमुख नगर ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवक संघटनेचे सचिव संतोष तुकाराम तडसे साहेब यांची झालेली ऑर्डर कॅन्सल करून आपली वर्णी लावली होती त्यावेळी गायमुख नगर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट आमदारांना साकडे घातले होते की ‘वादग्रस्त महिला ग्रामसेविका आमच्या गावाला नको’ त्यावेळी आमदारांनी ‘काही दिवसांसाठी ठेवा मग पाहू’ असे आश्वासन दिले होते.त्यावेळी पुन्हा या पदाधिकाऱ्यानी गटविकास अधिकाऱ्यांचे दालन गाठले. गट विकास अधिकाऱ्यांकडे आमच्या येथे या वादग्रस्त ग्राम विकास अधिकारी नको अशी मागणी केली परंतु या ग्रामविकास अधिकाऱ्यावर गटविकास अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने या पदाधिकाऱ्याला सांगितले की ‘आम्ही शासनाला कळवितो की, ग्रामसेवक पदासाठी महिला भरती करू नका, असं उत्तर दिले त्यामुळे या गावाला वादग्रस्त महिला ग्रामविकास अधिकारी मिळाल्या परंतु या ग्रामविकास अधिकाऱ्याने प्रभार घेताच रंग दाखविला. या गावात सुद्धा भानगडी करून थेट पोलीस स्टेशन गाठले.परंतु या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत मधील कामाच्या बातम्या लागू नये म्हणून दिवाळीच्या ऐन दिवाळीच्या तोंडावर सरपंच तसेच काही ग्रामपंचायत सदस्यांसोबत संगणमत करून तर काही ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवून एका अनुभवी ग्रामपंचायत सदस्यावर पत्रकारांची दिवाळी करण्यासाठी जबाबदारी दिली. त्यावेळी या ग्रामपंचायती च्या एक अनुभवी सदस्यांनी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी माहूर फाटा टी-पॉईंट वर काही तथाकथित पत्रकारांना बोलावून खैरात वाटली. तसे त्या ग्रामपंचायत सदस्यांनी कोणाकोणाला भ्रमणध्वनी करून संभाषण केले त्याची कॉल हिस्ट्री सुद्धा मिळू शकते. परंतु तरीही या ग्रामपंचायतीच्या बातम्या प्रकाशित बातम्या प्रकाशित झाल्यामुळे या वादग्रस्त ग्रामविकास अधिकाऱ्याने एका तुटपुंजी पगारावर काम करणाऱ्या संगणक परिचालकाच्या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करुन ज्या तथाकथित पत्रकारांना दिवाळीची खैरात वाटली होती. त्या तथाकथित पत्रकारांना बोलावून माझ्यावर कसा अन्याय झाला असा आव आणून आपली आपबिती ग्रामपंचायत कार्यालयात रेकॉर्ड मोबाईल द्वारे रेकॉर्ड केली. तक्रारकर्ता माझ्यावर दबाव टाकत असल्याची खोटी माहिती दिली. परंतु या ग्रामविकास अधिकाऱ्याने “आपलं ठेवलं झाकून दुसऱ्याचं पाहिलं वाकून” अशी वेळ आनली यावेळी मागील पंचवार्षिक कार्यकारणीतील बॉडीत सदस्य पदावर असलेल्या व मधुकर नगर येथील स्वस्त धान्य दुकानदार व आजच्या सरपंच बाईंना माहिती देण्यास सांगितले की , संगणक परिचालक कार्यालयात हजर राहत नव्हता परंतु मागील कार्यकाळात ह्या महिला सदस्य हे फक्त मीटिंग पुढच्याच कार्यालयात हजर राहत असून त्या फक्त सयाजीराव होत्या. तर सुभाष खिल्लारे हे विरोधात असल्याने यांच्या मागिल कार्यकाळातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. परंतु संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी संगणक परिचालकाच्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे अजूनतरी सत्यता पडताळणी नसल्याने दिसून येत आहे.यावेळी या पत्रकार परिषदेला गायमुखनगर येथील स्वस्तधान्य दुकानदार व सरपंचबाई सौ.सुनिता गायकवाड, उपसरपंच मोहम्मद वसी अब्दुल लतीफ, सदस्य संगीता कांबळे, विनोद चव्हाण, सुभाष किसन खिल्लारे, अनिल गादेकर, गणेश सरगर, नव्यानेच झालेले तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, सरपंच बाईचा नवरोबा मदन गायकवाड, काही ग्रामपंचायत सदस्याचे पतीदेव, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी , दिग्रस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर जातकर उपस्थित होते. त्यामुळे या वादग्रस्त महिला ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामपंचायत कार्यालयातून हकालपट्टी करून तात्काळ मुख्यालयी जमा करून दुसरा कोणताही ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.



