ईतर

दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पुसद::येथील काळा मारोती संस्थान व आझाद विशाल मित्र मंडळ तसेच विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देवी वार्ड येथे नुकताच आयोजीत करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक निशांत बयास हे होते. प्रमुख अतिथी म्हणून दामजीभाई जेठवा,ओमप्रकाश तिवारी,ईशान पापीनवार,अरुण वायकोस,लक्ष्मण नेतनसकर,रवी लासीनकर,दिशांत जोगी,संजय कोटलवार,सुरज चीद्दरवार उपस्थीत होते. या प्रसंगी बारावीतील पल्लवी वायकोस,प्रथमेश मानका,प्रणव बजाज,राणी गायकवाड,आदित्य पानपटे,धनश्री चिद्दरवार तसेच दहावीतील यश गुप्ता,राज गुप्ता,सलोनी दिक्षित, इशिता जोगी,प्रतीक्षा शेवाळे,अपूर्वा पानपटे,भूमी पंडीतकर,प्रथमेश जाधव, रेणू मुक्कावार,ओंकार कोटलवार,शिवतेज पाटील,अभिषेक चौधरी,वैभवी बोधनकर,प्रतीक्षा कावळे,जय जाधव,सुमित लांडगे यांचा निशांत बयास व उपस्थीत मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्प गुच्छ,मिठाई, व गृहपयोगी वस्तू भेट देवून यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान सदर प्रभागातील सक्रीय असलेले निशांत बयास यांचाही नागरिकांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन अनिल वायकोस यांनी केले.आभार रिंकू वाजा यांनी मानले सलग दुसऱ्या वर्षी आयोजीत या सत्कार कार्यक्रमाला देवी वार्डातील तसेच गुणवंतांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close