पुसद शहर पोलिसांची कारवाई!सुगंधी तंबाखू वाहतूक करणारा जेरबंद ;८०,६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुसद:शहर पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या माहूर फाट्याजवळ ८ ऑगस्टच्या दुपारी ४ ते ६ वाजता सुमारास पोलिस पेट्रोलिंग गस्त घातल असतांना एक इसम ऑटो मधून अवैध सुगंधी तंबाखूची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळाली. या दरम्यान संशयितरित्या ऑटो वाहनाला थांबवून झाडाझडती घेतली असता. आरोपी जमीर खा अजब खा (३८) वर्ष रा. प्रभात नगर बंजारा हिल्स धनकेश्वर रोड पुसद हा त्याच्या वाहनांमध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. ऑटो वाहन क्रमांक एम एच २९ सीएच ६५४५ अंदाजे किंमत ५० हजार रुपये असा एकूण ८०६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीने राज्य शासनाचे संदर्भीय अधिसूचनेचे उल्लघन करून जाणीवपूर्वक प्रतिबंधक अन्न पदार्थ बाळगुन वाहतूक करित असतांना मिळुन आल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध शहर पो.स्टे. पुसद येथे अप क्रमांक अप.क्र ५१६/२०२३ कलम ३२८,२७२,२७३,१८८ भादवि सह कलम २६ ( २ ) (०) ३०(२) (३)| ५९ अन्न सुरक्षा आणी मानके अधिकनियम २००६ चे कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.



