राजकियराज्य

‘लोकशाहीचा हा मोठा विजय’, शरद पवारांची सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया

मुंबई( वृत्तसेवा )१९फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर दिलेल्या निकालाचा विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला मोठा दिलासा आहे. सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला सात दिवसात चिन्ह देण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांवर अजित पवार गटाला पुढच्या दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीवर शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. या दोन्ही नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर समाधान व्यक्त केलं. त्यानंतर आता स्वत: शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवर (X) प्रतिक्रिया दिली आहे. हा लोकशाहीचा मोठा विजय आहे, अशी पहिली प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.                    शरद पवार नेमकं काय म्हणाले?                 “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. हा मतदारांचा विजय आहे, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये, असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला. आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे अंतिम मुद्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे”, असं शरद पवार यांनी नमूद केलं.“मध्यंतरी आम्हाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि माननीय निवडणूक आयोगाला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर ७ दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीचा हा मोठा विजय आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानासाठी आम्ही लढत राहू”, असं शरद पवार म्हणाले.                                                       सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय-काय घडलं?शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वात आधी युक्तिवादाला सुरुवात केली. राज्यसभा निवडणुकीत अजित पवार गटाने शरद पवार यांचंच नाव वापरलं, असा युक्तिवाद शरद पवार गटाने केला.अजित पवार यांच्या गटाचा व्हीप शरद पवार गटाला लागू होत नाही, असा युक्तिवाद शरद पवार गटाने केला. व्हीपच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.दोन्ही गटांनी घटना पाळली नाही. कोणीही अपात्र ठरलं नाही. split वगळून merger ची तरतूद करण्यात आली. त्याचा उद्देश काय होता? पण यामध्ये मतदारांचे काय?, असे प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केले.निवडणूक आयोगाने दिलेलं तात्पुरतं नाव लोकसभा निवडणुकीपर्यंत कायमचं ठेवा, अशी मागणी शरद पवार गटाने केली. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार हेच नाव निवडणुकीपर्यंत राहूदे, अशी मागणी शरद पवार गटाने केली.लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी तात्पुरता पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात यावं, अशी मगाणी शरद पवार गटाने केली. त्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश दिले.शरद पवार गटाने मागणी केल्यानंतर १आठवड्यात चिन्हं दिलं जावं, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close