पुसद शहर पो.स्टेच्या पोलीस निरीक्षक पदी उमेश बेसकर रुजू होताच पत्रकारांशी साधला संवाद; वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणार असल्याचे दिले आश्वासन!

पुसद: शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी उमेश बेसकर रुजू होताच शहरातील प्रिंट मीडिया व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला असून शहर पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणार असल्याचे आश्वासन दिले.शहरात मागील काही दिवसांपासून पोलिस स्टेशन घ्या हद्दीत वाढती गुन्हेगारीने तोंड काढले आहे.पुसद शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समाजातील सर्व नागरिक लोकप्रतिनिधी व पत्रकार यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. शहरांमध्ये होणाऱ्यां विविध प्रकारच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सर्वच प्रतिनिधी समाज बांधव प्रतिष्ठित नागरिक या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे सांगितले.नागपूर चंद्रपूर, गडचिरोली गोंदिया येथे कामाचा अनुभव घेत नुकतेच कळंब पोलीस स्टेशनमध्ये काही दिवस त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील काळात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र पकडण्यात आले असून या प्रकाराला अजूनही आळा बसलेला नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावेळी ते बोलताना म्हणाले की यावर योग्य ते नियोजन करून गुन्हेगारी चा बिमोड करण्याचा निर्धार बोलून दाखविला. सध्या शहरात चिडीमारी तसेच बस्थानक परिसरात चोरी अनेक गुन्हे घडत असतात तर अवैध वाहतुकीचा मोठा प्रश्न अवकाढून उभा आहे त्यातच रस्त्यावर अतिक्रमण सर्रासपणे सुरू आहे.शहरात पेट्रोलिंग वाढवून ऑटोची कागदपत्रे तपासणी मोहीम राबविण्यात येईल. महिला, व्यापारी, शाळा व्यवस्थापन यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.हे शहर संवेदनशील आहे या शहरात आता मात्र एकोपा वाढला ही समाधानाची बाब असून सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेणार असल्याचे असेही ते म्हणाले. सण उत्सव मध्ये शांतता अबाधित राखण्यासाठी जोर देणार असून अवैध व्यवसाय, अवैध दारू विक्रेत्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार, असल्याचा मानस पोलीस निरीक्षक बेसरकर यांनी बोलून दाखविला. यावेळी पीएसआय शरद लोहकरे, गोपनीय विभागचे नितेश भालेराव सर्व प्रसार माध्यमांचे व प्रिंट मिडियाचे प्रतिनिधी संपादक आदी उपस्थित होते.



