दिग्रस येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न …

दिग्रस /प्रतिनिधी: येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.१५ सप्टेंबर२०२४ रोजी संविधान मंदिर उद्घाटन सोहळा खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य श्री. आर.एस.कहाळे होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणुन यशस्वी उद्योजक तथा आय.एम.सी. सदस्य आय.टी.आय दिग्रस विष्णुपंत बेलगमवार तसेच पुंडलिक दिवे आय.एम.सी. सदस्य आय.टी. आय . दिग्रस उपस्थिती होते.प्रमुख व्याख्याते म्हणुन श्री. डॉ. अजय जाधव विभाग प्रमुख(राज्यशात्र) बा.बु.कला.ना.भ.वाणिज्य व बा.पा.विज्ञान महाविद्यालय दिग्रस हेउपस्थित होते.त्यांनी भारतीय संविधानावर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन कु . अनुसया पुसांडे यांनी केले. प्रास्ताविक श्री बी.एस. देशपांडे निदेशक, आभार प्रदर्शन श्री. एस.डी. महल्लेशिल्पनिदेशक, यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कु.एम.एस.ठोसर, सर्वश्री जी.एस.काजळे,एस.एन. राठोड, वि.आर. जाधव, व्ही.एन.पवार, बी.सी.ठवकर, वाय.पी. राऊत,ए.ए.राऊत, व्ही.के.चव्हान, पी.व्ही.घाटगे, एस.एस. वलीवकर, के.टी.मस्के,एस.के. मस्के तसेच संस्थेचे सुरक्षा रक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.अशी माहिती संस्थेचे प्राचार्य एम.एस. कहाळे यांनी दिली आहे .



