ईतर

डॉ.सौ.आरतीताई फुपाटे यांची उमरखेड विधानसभा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती!

पुसद: येथील जेष्ठ नेत्या भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सौ. आरतीताई फुपाटे यांची उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली आहे. डॉ.सौ.आरतीताई फुपाटे यांची उमरखेड विधानसभा प्रमुखपदी निवड झाल्याने येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणूक मध्ये डॉ. सौ. आरतीताई च्या संघटन कौशल्य फायदा करून घेण्यासाठीच भाजप यांनी नियुक्ती केली असे बोलले जाते.उमरखेड मतदार संघ आदिवासी बहुल भाग असल्या कारणाने व आदिवासी समाजात त्यांना चाहतावर्ग मोठ्या प्रमाणे असल्यामुळे त्यांचा फायदा पक्षाला अच्छे दिन आणल्या शिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे जीप अध्यक्षा असतांनी जिल्ह्याचे अखेरचे टोक असलेल्या तालुक्यावर सुद्धा त्यांचे लक्ष होते त्यामुळे त्यांनी त्या भागातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण डॉ. आरतीताई पदावर असो किंवा नसो त्या सामाजिक कार्यात व तळागाळातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात नेहमीच सक्रिय असतात समाजातील तळागाळातील जनतेसाठी हाकेला ओ देणाऱ्या व संवेदनशील व्यक्तीमत्व आहेत. त्या जनसामान्याचा चेहरा आहेत. त्यामुळे पक्षांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष यांनी केलेल्या डॉ.सौ. आरतीताई फुफाटे यांच्या नियुक्ती चे श्रेय त्यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भूतडा, जिल्ह्याचे नेते आ.मदन येरावार व आ.ॲड. निलय नाईक यांना दिले आहे. तर त्यांच्या या निवडीने भाजपामधील अनेक आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close